वृत्तसंस्था
पुणे : शहरातील महापालिकेच्या ५७ दवाखान्यात उद्या (सोमवारी) कोव्हिशिल्ड लस उपलब्ध राहणार आहे. तर ससूनसह ७ दवाखान्यात कोव्हॅक्सिन लस उपलब्ध राहणार आहे. Covishield vaccine will be available in 57 Hospitals of Pune Municipal Corporation tomorrow
महापालिकेच्या माहितीनुसार १८ वर्षांवरील नागरिकांना २० टक्के लस ही ऑनलाईन बुकिंगव्दारे, तर २० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून मिळणार आहे.
कोव्हिशिल्ड लसीच्या उर्वरित साठ्यापैकी ३० टक्के लस ही ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना ( १६ मे पूर्वी लस घेतलेल्यांना) ऑनलाईन बुकिंगव्दारे तर ३० टक्के लस ही ऑन दी स्पॉट नोंदणी करून दुसरा डोस म्हणून मिळणार आहे.
लसीकरण बुकिंग करण्यासाठी सकाळी ८ वाजता ऑनलाईन स्लॉट ओपन होणार आहे. तसेच सेशन संपण्यापूर्वी उघडलेल्या लसीच्या कुपीत लस शिल्लक राहिल्यास ऑन द स्पॉट नोंदणी करून लस नागरिकांना द्यावी, अशा सूचना प्रत्येक लसीकरण केंद्रास देण्यात आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App