Congress आत्ता फोडतायेत EVMs वर खापर; पण काँग्रेसला आधीच लागली होती पराभवाची चाहूल!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीतल्या पराभवाचे खापर महाविकास आघाडीचे आणि काँग्रेसचे नेते सध्या जरी वड्याचे तेल वांग्यावर काढून EVMs वर खापर फोडत असले, तरी प्रत्यक्षात काँग्रेसला मतदानापूर्वी चार आठवडे घेतलेल्या अंतर्गत सर्वेक्षणातून पराभवाची चाहूल लागण्याची बातमी समोर आली आहे. Congress was already feeling the pinch of defeat.

लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस 14 खासदार मिळवून महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा पक्ष बनला होता पण चारच महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींनी अशी काही जादू केली की, त्यातून काँग्रेसची घसरण आणि महाविकास आघाडीला तडाखा अशा निकालापर्यंत परिस्थिती येऊन ठेपली.


Sharad pawar मास्टर माईंड + जरांगेंचे नेहमीच माध्यमांमध्ये “मास्टर स्ट्रोक”; पण ऐनवेळी अवसानघातातून बाउंड्री वर कॅच आऊट!!


लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात “क्लिक” झाली हे काँग्रेसला अंतर्गत सर्वे मधूनच लक्षात आले. काँग्रेसने 103 मतदार संघांमध्ये अंतर्गत सर्वेक्षण केले. त्या सर्वेक्षणाला 50309 लोकांनी प्रतिसाद दिला. विविध प्रश्नांची उत्तरे दिली. त्यामध्ये तब्बल 88 % लोकांनी लाडकी बहीण योजनेला सकारात्मक प्रतिसाद दिला. यातूनच काँग्रेसला पराभवाची चाहूल लागली होती. 103 मतदार संघांपैकी 44 मतदार संघात महाविकास आघाडी आघाडी वरती तर 59 मतदारसंघांमध्ये महायुतीला आघाडी मिळाल्याचे दिसून आले होते.

याचा अर्थ लोकसभेतला डेफिसिट महायुतीने लाडकी बहीण योजनेतून भरून काढला. इतकेच काय पण दलित ओबीसी आणि अन्य छोट्या मोठ्या वर्गांमधून महायुतीला वाढता पाठिंबा असल्याचे काँग्रेसच्या लक्षात आले होते. काँग्रेसचा मुस्लिम बेस मात्र जसाच्या तशा असल्याचे दिसून आले होते.

प्रत्यक्षात काँग्रेसचा विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाला. लोकसभा निवडणुकीत 14 खासदार मिळवणारी काँग्रेस 16 आमदारांवर आली. त्याचा पक्ष नेतृत्वाला फार मोठा धक्का बसला, पण असेच अपयश उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याही वाट्याला आले. त्यामुळे आता हे तिघे एकत्र येऊन पराभवाचे खापर लाडक्या बहिणींवर फोडणे ऐवजी ते EVMs वर फोडू लागले आहेत.

Congress was already feeling the pinch of defeat.

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात