विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र मध्ये राष्ट्रवादी आणि भाजप यांच्या झंझावातात देखील कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस टिकवून ठेवण्यात सतेज उर्फ बंटी पाटलांचा मोठा हात, पण कोल्हापुरात राजघराण्यात वाद पक्षांतर्गतही वाद, त्यामुळे आज काँग्रेसची पुरती नाचक्की झाली!! Congress MP shahu maharaj brought Congress in a fix in kolhapur
काँग्रेसचे खासदार शाहू महाराज यांच्या दबावापोटी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार त्यांच्या सुनबाई मधुरिमा राजे यांना माघार घ्यावी लागली. त्याचे कोल्हापुरा बरोबरच संपूर्ण महाराष्ट्रात देखील राजकीय पडसाद उमटले.
कोल्हापुरात उत्तर मतदारसंघात काँग्रेसने सुरुवातीला नगरसेवक राजू लाटकर यांना उमेदवारी जाहीर केली होती. परंतु, एकाच रात्रीत चक्रे फिरली आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी मधुरिमा राजे यांना तिकीट देऊन मैदानात उतरवले. त्यामुळे राजू लाटकर अर्थातच नाराज झाले, पण त्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला. त्यांनी शाहू महाराजांची दोनदा भेट घेतली. त्यानंतर शाहू महाराजांचे मत बदलले. एकाच घरात दोन पदे नकोत, असे त्यांचे मत झाले, असे सांगितले जात आहे. पण त्याआधी सतेज पाटलांनी स्वतःची प्रतिष्ठा काँग्रेस श्रेष्ठींपुढे पणाला लावून कोल्हापूर उत्तरचे तिकीट बदलायला लावले होते ते त्यांनी मधुरिमा राजे यांना द्यायला लावले होते.
पण शाहू महाराज आणि त्यांचे चिरंजीव मालोजी राजे हे मधुरिमा राजे यांना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात घेऊन आले. यांच्या हजेरीत माघारीच्या फॉर्म वर सही करा, असे आदेश शाहू महाराजांनी मधुरिमा राजे यांना दिले. त्यामुळे मधुरिमा राजे यांनी आज दबावापोटी का माघार घ्यायला लावली??, याविषयी सतेज पाटलांनी शाहू महाराजांसमोरच प्रचंड संताप व्यक्त केला. झक मारायला मला तोंडघशी पाडले. दम नव्हता तर लढायचेच कशाला??, अशा परखड शब्दांमध्ये सतेज पाटलांनी थेट शाहू महाराजांसमोरच आपला संताप व्यक्त केला आणि ते कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेले.
मालोजी राजे देखील या सगळ्या प्रकारात नाराज होते. ते त्यांनी उघडपणे मीडियाशी बोलताना सांगितले. मी अस्वस्थ आहे, पण मी नंतर तुमच्या सगळ्यांची बोलेल असे सांगून ते निघून गेले. यातून शाहू महाराजांच्या घराण्यातले राजकीय मतभेद देखील समोर आले. या सगळ्या मध्ये काँग्रेसची मात्र महाराष्ट्रभर नाचक्की झाली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App