हेमंत सोरेन सरकारने रोहिंग्या आणि बांगलादेशींसाठी दरवाजे उघडले आहेत, असा आरोपही केला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Ravi Shankar Prasad भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी आयएएनएस या वृत्तसंस्थेशी विशेष संवाद साधला. यावेळी त्यांनी झारखंड आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या विजयाचा दावा केला.Ravi Shankar Prasad
रविशंकर प्रसाद यांनी काँग्रेस आणि झारखंडच्या विद्यमान सरकारवर गंभीर आरोप केले. ते म्हणाले की, अटलबिहारी वाजपेयी यांच्या राजवटीत झारखंडमध्ये आदिवासींच्या विकासासाठी अनेक महत्त्वाची पावले उचलण्यात आली होती, मात्र सध्या काँग्रेस आणि हेमंत सोरेन सरकारने रोहिंग्या आणि बांगलादेशींसाठी दरवाजे उघडले आहेत. झारखंडमध्ये सरकार स्थापन केल्यानंतर एनडीए ही परिस्थिती संपवेल.
ते पुढे म्हणाले की, झारखंड आणि महाराष्ट्रात एनडीएचा मोठा विजय होईल. दोन्ही ठिकाणी स्वार्थी आघाडी झाली असून, जनता त्यांना उत्तर देईल. झारखंडमध्ये परिवर्तनाची गरज असून जनता या महाआघाडीला पूर्णपणे नाकारेल. झारखंडमध्ये आदिवासींच्या हक्कांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न होऊ दिला जाणार नाही आणि हे षड्यंत्र हाणून पाडण्यासाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. झारखंडमधील आदिवासींच्या हक्कांचे रक्षण आणि विकास ही भाजपची प्राथमिकता असल्याचे ते म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App