इंडिया आघाडी सत्तेत आली तर निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया बदलू, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे प्रतिपादन

विशेष प्रतिनिधी

सातारा : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी याच वर्षाच्या सुरुवातीला निवडणूक आयोगाची निवड प्रक्रिया बदलून सरन्यायाधीशांना काढून टाकत पंतप्रधान, एक मंत्री आणि विरोधी पक्षनेता एवढेच पद ठेवले. आमचे सरकार आल्यास आम्ही निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया बदलून त्यामध्ये सरन्यायाधीशांचा समावेश करू, असे त्यांनी सांगितलं.Congress leader Prithviraj Chavan asserts that if the India Aghadi comes to power, the election commission selection process will change

काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र दुष्काळ पाहणी समितीचे अध्यक्ष, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी रविवारी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे काँग्रेसच्या आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर सायंकाळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, निवडणूक आयोगावरील एकटा विरोधी पक्षनेता काय करणार? नव्या व्यवस्थेत दोन निवडणूक आयुक्त नेमले. ते कोणला फॉर राहणार हे माहीत नाही. यामुळे आमचे सरकार आल्यावर सर्वप्रथम आम्ही निवडणूक आयोगाच्या निवडीची प्रक्रिया बदलू.



दुष्काळाच्या प्रश्नावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सरकार निद्रितावस्थेत असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. दुष्काळाची माहिती देऊन आचारसंहिता शिथिल करण्याबाबत सरकारने निवडणूक आयोगाला विनंती करावी, असं आवाहनही त्यांनी केलंय.

दुष्काळाची दाहकता सरकारला अजून समजलेली दिसत नसल्याने सरकार वेळकाढूपणाची भूमिका घेत असल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाणांनी केला आहे. जनावरे पाण्याविना तडफडत आहेत. शेकडो गावे आणि शहरांमध्ये १५ दिवसातून एकदा पाणी येत आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून तात्काळ उपाययोजना केल्या जाण्यासाठी काँग्रेस तत्पर राहणार असल्याचं त्यांनी सागितलं.

आचारसंहिताच्या नावाखाली काही करायचे नाही, हा नवीन पायंडा पाडला जात आहे. लोकसभा गठीत होईपर्यंत आचारसंहिता हटवायची नाही असे चुकीचे धोरण सरकारने घेतले आहे. तसेच राज्यपाल मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानेच काम करत असल्याचा आरोपही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.

Congress leader Prithviraj Chavan asserts that if the India Aghadi comes to power, the election commission selection process will change

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात