जरांगेंच्या आंदोलनाला राष्ट्रवादीचा “इंधनपुरवठा”, पण फायदा काँग्रेसला; चौथा नंबरवरून पक्ष मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आला!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकसभा निवडणुकीदरम्यान मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाला सगळा इंधनपुरवठा राष्ट्रवादी काँग्रेसने केला, पण प्रत्यक्षात निकालामध्ये त्याचा फायदा काँग्रेसला झाला आणि काँग्रेस पक्ष चौथ्या नंबर वरून पहिला नंबर वर येत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आला.Congress came strongly to claim the chief ministership with double digit numbers in loksabha elections



मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा लाभ शरद पवारांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांना झाला. उद्धव ठाकरेंच्या पक्षाला अनुषंगिक लाभ झाला. परंतु पवारांच्या पक्षाचा डिजिट वाढला नाही. पवारांचे फक्त आठच खासदार निवडून आले. त्या उलट काँग्रेसचे 14 खासदार निवडून आले सांगलीतून विशाल पाटील अपक्ष निवडून आले आणि त्यांनी आपल्या विजयाचे श्रेय मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला दिले. त्या पाठोपाठ त्यांचे सहकारी माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी काँग्रेसचा थेट मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचाच मुख्यमंत्री असेल असे त्यांनी मिरजेमध्ये जाहीर केले.

त्या उलट संजय राऊत सांगलीतल्या जागेच्या पराभवाचा खापर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यावरच फोडत राहिले सांगलीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराचे काम काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केले नाही त्यामुळे शिवसेनेला जागा गमवावी लागली, असे रडगाणे राऊत यांनी गायले.

त्याचवेळी विश्वजीत कदम आणि विशाल पाटील यांनी मिरजेमधून काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदावर दावा ठोकला. या सगळ्या भांडणामध्ये शरद पवारांच्या पक्षाला 8 जागा मिळून तो पक्ष महाविकास आघाडी तिसऱ्याच क्रमांकावर राहिला त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या मुख्यमंत्री पदाची चर्चा फक्त पोस्टरवर राहिली.

Congress came strongly to claim the chief ministership with double digit numbers in loksabha elections

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात