Maharashtra Landslide : राज्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray Announced Help To kin of the dead and injured in Maharashtra Landslide disaster

Maharashtra Landslide : राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत. CM Uddhav Thackeray Announced Help To kin of the dead and injured in Maharashtra Landslide disaster


विशेष प्रतिनिधी

मुंबई : राज्यातील अतिवृष्टीमुळे दरड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदनाही मुख्यमंत्री ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे (दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्ह्यात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरड कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.

अजित पवार यांचा राजनाथ सिंहांना फोन, लष्कराची मागितली मदत

रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे.

कोणत्या ठिकाणी किती मृत्यू…

चिपळूणमधील अपरांत हॉस्पिटल, कोव्हिड सेंटरमधील 8 रुग्णांचा मृत्यू
तळीये, महाड – 38 मृतदेह हाती
आंबेघर, सातारा – १२ जणांचा मृत्यू
पोलादपूर, रायगड – 11 जणांचा मृत्यू
वाई, सातारा – 2 महिलांचा मृत्यू
कणकवली – दिगवळे, सिंधुदुर्ग – 1 महिलेचा मृत्यू
राज्यात आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू

पंतप्रधान मोदींनीही जाहीर केली मदत

त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रायगडमध्ये भूस्खलनामुळे ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान कार्यालयाने म्हटले की, पीएम नरेंद्र मोदी यांनी रायगड, महाराष्ट्रात दरड कोसळल्यामुळे प्राण गमवावे लागलेल्या लोकांच्या पुढच्या नातेवाइकांसाठी पीएमएनआरएफकडून प्रत्येकी दोन लाख रुपयांची रक्कम जाहीर केली, तर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.

त्याच वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले की, महाराष्ट्रातील रायगडमध्ये मुसळधार पाऊस आणि दरड कोसळल्यामुळे झालेला अपघात अत्यंत खेदजनक आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एनडीआरएफचे डीजी एसएन प्रधान यांच्याशी बोललो आहे. एनडीआरएफचे पथक मदत व बचाव कामात व्यग्र आहे. केंद्र सरकार तेथे सर्वतोपरी मदत करत आहे.

CM Uddhav Thackeray Announced Help To kin of the dead and injured in Maharashtra Landslide disaster

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात