मोठी बातमी : यावर्षी इयत्ता १ली ते १२ वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात 25 टक्के कपात; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

Std 1 to 12 syllabus revised and reduced by 25 per cent like last year Says edu minister Varsha Gaikwad

Std 1 to 12 syllabus reduced by 25 per cent : देशातील कोरोनाच्या परिस्थितीत अद्यापही सुधारणा झालेली नाही. अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि विविध निर्बंध लागू असल्याने अनेक शाळांनी विद्यार्थांचे ऑनलाइन शिक्षण सुरू केलं आहे, मात्र ऑनलाइन शिक्षणालाही मर्यादा आहेत. त्यामुळेच गतवर्षीप्रमाणे या वर्षीही शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. Std 1 to 12 syllabus reduced by 25 per cent like last year Says edu minister Varsha Gaikwad


विशेष प्रतिनिधी

मुंबई : देशातील कोरोनाच्या परिस्थितीत अद्यापही सुधारणा झालेली नाही. अनेक ठिकाणी लॉकडाऊन आणि विविध निर्बंध लागू असल्याने अनेक शाळांनी विद्यार्थांचे ऑनलाइन शिक्षण सुरू केलं आहे, मात्र ऑनलाइन शिक्षणालाही मर्यादा आहेत. त्यामुळेच गतवर्षीप्रमाणे या वर्षीही शालेय अभ्यासक्रमात 25 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

शिक्षणमंत्री डॉ. वर्षा गायकवाड यांनी ट्विट करून म्हटले की, कोरोनामुळे यंदाही शाळा वेळेत सुरु न करता आल्याने विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा व तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावीत,याअनुषंगाने हा निर्णय घेतला आहे.कमी केलेल्या पाठ्यक्रमाची तपशीलवार माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. सर्व संबंधित घटकांशी विचारविनिमय केल्यानंतर आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून गतवर्षीप्रमाणे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इ. १ ली ते इ. १२ वीपर्यंतचा २५% पाठ्यक्रम कमी करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन तसेच शिक्षक व पालक संघटनेने केलेल्या मागणीचा विचार करून यावर्षीच्या शैक्षणिक वर्षात शिक्षण विभागाने 25% अभ्यासक्रम कमी करून विद्यार्थ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. कोरोनामुळे यंदाही शाळा वेळेत सुरु न करता आल्याने विहित वेळेत पाठ्यक्रम पूर्ण व्हावा आणि तणावमुक्त वातावरणात विद्यार्थ्यांना त्यांची शिक्षणातील उद्दिष्टे साध्य करता यावीत, याअनुषंगाने हा निर्णय घेतला आहे, असेही गायकवाड यांनी सांगितले.

Std 1 to 12 syllabus reduced by 25 per cent like last year Says edu minister Varsha Gaikwad

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था