CM Devendra Fadnavis : याला म्हणतात आकड्यांची गुगली; गणित कच्चं असलेल्या विद्यार्थ्याने मास्तरचीच विकेट काढली!!

CM Devendra Fadnavis

नाशिक : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक झाली त्यामध्ये महायुती निवडून आली. महाविकास आघाडी पराभूत झाली. त्यानंतर सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री बदलले. नव्या सरकारचा कारभार सुरू झाला, तरी महाविकास आघाडीचे पराभवाचे रडगाणे थांबायला काही तयार नाही. उलट शरद पवारांसारखे ज्येष्ठ नेते शिंग मोडून वासरात शिरले आणि तेही राहुल गांधींसारखे ईव्हीएम विरुद्ध रडगाणे गायला लागले.

काँग्रेसने जसे वाड्याचे तेल वांग्यावर काढत ईव्हीएम वर आपल्या प्रभावाचे खापर फोडले, तसेच शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या पराभवाबद्दल केले. त्यांनी देखील आत्मपरीक्षण वगैरे करायचे सोडून राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या पराभवाचे खापर ईव्हीएम वरच फोडले. कोल्हापुरातल्या पत्रकार परिषदेत त्यांनी मोठी आकडेवारी सादर करून हे आकडे कसे “आश्चर्यकारक” आहेत, याचे बहारदार वर्णन केले.

काँग्रेसला 80 लाख मते मिळाली पण 16 आमदार निवडून आले, पण अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 58 लाख मते मिळाली आणि त्यांचे 41 आमदार निवडून आले, या आकडेवारीने आम्हाला आश्चर्य वाटले, असे शरद पवार म्हणाले.

Farmer : शेतकरी नेते म्हणाले- केंद्राने चर्चा करावी, अन्यथा 8 डिसेंबरला दिल्लीत धडकू

पण शरद पवार यांच्यासारख्या चाणक्याला गणित कच्चे असलेल्या एका विद्यार्थ्याने आकड्यांचीच गुगली टाकत त्यांची विकेट काढली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकड्यांच्या लोकसभेतले आकडे सादर करून शरद पवारांना चपखल प्रत्युत्तर दिले. त्यावर अद्याप तरी शरद पवार काही बोलले नाहीत.

वास्तविक देवेंद्र फडणवीस यांचे गणित कच्चे. त्यामुळे शाळेत ते मागच्या बाकांवर बसायचे, असे त्यांच्या मित्रांनीच वेगवेगळ्या चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पण निवडणुकीच्या गणितात मात्र फडणवीसच मास्तर निघाले आणि त्यांनी वस्तादाची विकेट काढली.

शरद पवारांच्या आरोपांना त्यांच्याच शैलीत उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शरद पवार साहेब आपण ज्येष्ठ नेते आहात. किमान आपण तरी जनतेची दिशाभूल करू नये यासाठी आपण लोकसभेची आकडेवारी पाहू

2024 च्या लोकसभेत भाजपला मते मिळाली 1 कोटी 49 लाख १३९१४ आणि जागा मिळाल्या 9, पण काँग्रेसला मते मिळाली 96 लाख ४१८५६ आणि जागा मिळाल्या 13. शिवसेनेला मते मिळाली 73 लाख 77674 आणि जागा मिळाल्या 7, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाला मते मिळाली 58 लाख 51166 आणि जागा मिळाल्या 8.

2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे, असे सांगून फडणवीसांनी 2019 ची आकडेवारी देखील यावेळी सादर केली. 2019 मध्ये काँग्रेसला मते मिळाली होती 87 लाख 92237 आणि जागा मिळाली फक्त एकच, तर तत्कालीन अखंड राष्ट्रवादीला मते मिळाली होती 83 लाख 87363 आणि जागा मिळाल्या होत्या 4…!!

ही सविस्तर आकडेवारी सादर करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी, पराभव स्वीकाराल, तर त्यातून लवकर बाहेर याल आणि सहकाऱ्यांना आत्मपरीक्षणाचा सल्ला द्याल!!, असा टोला पवारांना हाणला. पण या निमित्ताने गणितातला कच्चा, पण निवडणुकीतला पक्का विद्यार्थी आणि माध्यमवीर चाणक्य यांच्यातली आकडेवारीची जुगलबंदी गाजली!!

CM Devendra Fadnavis befitting reply to sharad pawar

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात