कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनानिमित्त राज्याचे मुख्मयंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे पहिल्यांदाच एकाच मंचावर आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री आदिती तटकरे, आमदार सुनील प्रभू, नितेश राणे व इतर मंत्र्यांनी उपस्थिती लावली. याशिवाय केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ऑनलाइन हजेरी लावली. यावेळी नारायण राणेंनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांसमोर सिंधुदुर्गाच्या कामाचं श्रेय आपलंच असल्याचं म्हटलं. तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून फटकेबाजी केली. Chipi Airport Inaugration CM Uddhav Thackeray Full speech Reply to union Minister Narayan Rane
विशेष प्रतिनिधी
सिंधुदुर्ग : कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनानिमित्त राज्याचे मुख्मयंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे पहिल्यांदाच एकाच मंचावर आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, उदय सामंत, परिवहन मंत्री अनिल परब, मंत्री आदिती तटकरे, आमदार सुनील प्रभू, नितेश राणे व इतर मंत्र्यांनी उपस्थिती लावली. याशिवाय केंद्रीय नागरी उड्डयण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी ऑनलाइन हजेरी लावली. यावेळी नारायण राणेंनी पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांसमोर सिंधुदुर्गाच्या कामाचं श्रेय आपलंच असल्याचं म्हटलं. तर मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून फटकेबाजी केली.
आजच्या हा क्षण आदळाआपट करण्याचा नाही तर आनंद व्यक्त करण्याचं आहे. ज्योतिरादित्य यांचं अभिनंदन करतो. कारण इतक्या लांब राहूनही तुम्ही मराठी मातीचा संस्कार विसरला नाहीत. मातीचा एक संस्कार असतो. मातीच्या विना काही वेळेला मातीला जाणे. त्यात काही बाभळीचे आणि आंब्याची असतात. बाभळीचे झाडे उगवले तर माती म्हणणार का मी काय करु? जोपासावं लागतं. माझ्यासाठी हा मोठा सौभाग्याचा दिवस आहे. शिवसेना आणि कोकण हे नातं मी सांगायला नको. मी स्वत: अनेकदा म्हटलो आहे. कोकणवासीयांसमोर शिवसेना प्रमुख नतमस्तक झाले.
कुणी काय करावं हा ज्याचा – त्याचा विषय आहे. मी त्याविषयावर नंतर बोलेलही कदाचित. पण आजचा हा महत्त्वाचा दिवस आहे. आपलं कोकणचं महाराष्ट्राचं वैभव आपण जगासमोर नेत आहोत. जगातून अनेक पर्यटक इथे यावेत यासाठी सुविधा असण्याची गरज आहे. त्या सुविधांमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा विमानतळ असतो. आपण गोव्याच्या विरोधात नाही. पण आपलं वैभव कमी नाही. उलट आपण काकणभर सरस आहोत. कमी अजिबात नाहीत. एवढी वर्षे विमानतळाला का लागली? आम्ही कोकणचं कॅलिफोर्निओ करू असे काहीजण म्हणाले होते. तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते की, कॅलिफोर्नियाला अभिनमान वाटेल असं कोकण उभं करू. बाकीची गोष्ट आदित्यने सांगितली आहे. पांठतर करून बोलणं वेगळं, आत्मसात करून तळमळीने बोलणं वेगळं, मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं. त्याबद्दल मी नंतर बोलेन.
ज्योतिरादित्यजी, परवा आपली खूप चांगली बैठक झाली. मी प्रामाणिकपणे सांगतो, गेल्या दोन वर्षात एक कोरोना बोकांडी बसला आहेच. पण काहीवेळा केंद्रीय मंत्र्यांशी बोलावं लागतं. अनेकदा असं जाणवतं की, हे बोलणं कोरडं असतं. पण ज्योतिरादित्य ही अशी व्यक्ती आहे की त्यांनी स्वत:हून बैठकीची वेळ मागितली. मी काही बोलण्याआधी ज्योतिरादित्य अधिक तळमळीने बोलत होते. मला असं वाटलं मी केंद्रीय मंत्री आहे आणि ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दोघांची नाळ या मातीशी जोडली आहे. इथे राजकारण येणार नाही.
ज्योतिरादित्य आपण एकत्र येऊन विकास करूयात. जे काही आधीचे विकासाच्या बाबतीत बोलून गेले आहेत त्याबाबत मी परत बोलणार नाही. पण जेव्हा मी एरियल फोटोग्राफी करत होतो. महाराजांचे किल्ले. निदान सिंधुदुर्गाचा किल्ला तरी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला आहे. नाहीतर कोणतरी म्हणेल की तो किल्लाही मीच बांधला. निळेशार पाणी, सुंदर लाल माती आहे. हे सगळं वैभव मी हवाई फोटोग्राफीच्या निमित्ताने हेलिकॉफ्टरमधून बघितलं. आता आंतरराष्ट्रीय विमानतळ करण्याचा प्रयत्न आहेत. त्यासाठी मी ज्योतिरादित्य यांची मदत लागेल. इथे एक हेलिपोर्टही असलं पाहिजे. हेलिकॉप्टरने सुंदर किनाऱ्याचं वैभव हवेतून दिसेल तर पर्यटनाला चांगलं चालन मिळेल.
कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. हेही खरंय की या व्यासपीठावर महाराष्ट्राचे सर्व पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित आहेत. त्यामुळे सगळ्यांचं विकासासाठी अलायन्स आहे. एखादी चांगली गोष्टी असेल तर नजर लागू नये एक काळा तिट्टा लावावा लागतो. ते लावणारे काही लोकं आहेत. नारायण राणे आपण म्हणालात ते खरं आहे. आपण गोष्टी तुम्ही केल्या त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो. पण कोकणची जनता डोळे मिटून कधीच राहत नाही. ती शांत, संयमी आहे म्हणून सदासर्वदा भयभीत होऊन काहीतरी करेल असं नाही. ती मर्द आहे. म्हणूनच गेले अनेक वर्ष तिने हक्काचा लोकप्रतिनिधी आहे. म्हणून विनायक राऊत इथे निवडून आलेले खासदार म्हणून उभे आहेत. मला त्यांचा अभिमान आहे.
हेही खरं आहे. बाळासाहेबांना खोटं बोलणं अजिबात आवडायचं नाही. त्यांना एक क्षणही आवडायचं नाही. अशी खोटं बोलणारी जी लोकं होती त्यांना बाळासाहेबांनी शिवेसेनेतून काढून टाकलं होतं हासुद्धा इतिहास आहे. कटू असलं तरी चालेल पण खरं बोलं. खोटं बोललेलं मला चालणार नाही. खोटं बोलशील तर गेट आऊट. हे त्यांनी दाखवलंय. मला त्या इतिहासात जायचं नाही. आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना सुक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे, त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करून द्याल ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे. मी कुठेही पक्षभेद आणत नाही. तुमच्या कॉलेजच्या बाबतीत जेव्हा फोन केला तेव्हा दुसऱ्याच क्षणी मी सही केली. विकासाच्या कामात मी कोतेपणा आणू इच्छित नाही. पण पेढ्यातला गोडेपणा अंगी बाळगावा लागतो. म्हणून तिळगूळ घ्या गोड बोला असं म्हणतात. मला बोलायचं नाही. मला बोलावं लागलं. आजचा कार्यक्रम कोकणसाठी महत्त्वाचा आहे. सगळे मिळून काम करू.
Sindhudurg Greenfield Airport Inauguration-LIVE #ChipiAirport https://t.co/fixR5bssZq — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 9, 2021
Sindhudurg Greenfield Airport Inauguration-LIVE #ChipiAirport https://t.co/fixR5bssZq
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 9, 2021
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पुढे आले आहेत. सगळे मिळून काम करु. आजपर्यंत जे खड्डे मग ते कारभाराचे किंवा रस्त्यावरचे पडले किंवा पाडले गेले असतील ते बुजवण्याचं काम एकत्र मिळून करणार नसू तर आपल्याला निवडून दिलेल्या जनेतचं दुर्भाग्य असेल. खड्ड्यात गेलेली लोकशाही, असं बोलण्याची वेळ निदान त्यांच्यावर येऊ द्यायची नसेल तर विकासाच्या कामात राजकीय जोडे आणू नाही. हे माझं महाराष्ट्राचं राज्य आहे, जसं ज्योतिरादित्य शिंदे बोलले ती परंपरा आपण घेऊन पुढे जातो आहोत. ती घेऊन जात असताना तलवार चालवायची वेळ आलीच तर ती तलवार आपल्या देशाच्या-राज्याच्या शत्रूवर चालली पाहिजे. आपपासात जर चालली तर तसं दुर्भाग्य या मातीचं दुसरं कोणतं नसेल. मी आपल्याला परवा विधानभवनात बोललो होतो. संधी मिळणं हे मोठं काम असतं. संधी मिळायला कष्ट तर लागतं याशिवाय नशीबही लागतं. या संधीची माती न करता सोनं करण्याचा प्रयत्न केला तरच या सगळ्याचा उपयोग होईल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App