गावा-गावांमध्ये, शहरात, प्रत्येक वार्डात सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरूवात होणार आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणार असून या उपक्रमात जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. Chief Minister Shindes appeal to the people participating in the activity Give an hour for cleanliness
मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, “स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीच्या आदल्या दिवशी रविवारी १ ऑक्टोबर रोजी राज्यात सर्वत्र नागरी तसेच ग्रामीण भागात “एक तारीख एक तास” या उपक्रमांतर्गत प्रत्येकाला ते जिथे कुठे असतील तिथे स्वच्छता, साफ-सफाई करून या अभियानात सहभागी होता येणार आहे.”
मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण नाही; विविध संस्थांच्या निधी वाटपातही आणणार सुसूत्रता!!
याशिवाय ”गावा-गावांमध्ये, शहरात, प्रत्येक वार्डात सकाळी १० वाजेपासून या मोहिमेची सुरवात होईल. यात सफाई मित्र ही सहभागी होतील. काही ठिकाणी स्वच्छतेचे महत्व पटवून देणारी विशेष शिबिरे-प्रदर्शने आयोजित केली जातील. ज्यातून स्वच्छतेची गरज, त्यांचे फायदे, महत्व पटवून दिले जाईल.” असेही सांगितले.
स्वच्छतेसाठी द्या एक तास.. स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणार असून या उपक्रमात जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत. “स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत… pic.twitter.com/gxScWn4Z0a — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 30, 2023
स्वच्छतेसाठी द्या एक तास..
स्वच्छतेसाठी “एक तारीख एक तास” या रविवारी १ ऑक्टोबर रोजी राबवण्यात येणार असून या उपक्रमात जनतेने उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन महाराष्ट्राला देशात अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.
“स्वच्छता पंधरवडा-स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत… pic.twitter.com/gxScWn4Z0a
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) September 30, 2023
याचबरोबर, “स्वच्छता ही सवय आहे. आपल्याला स्वच्छतेची शिस्त अंगिकारायची आहे. त्याला संस्काराचे रूप द्यायचे आहे. हे अभियान शंभर टक्के यशस्वी करून देशात आपल्या महाराष्ट्राला अव्वल स्थान मिळवून द्याल. चला महाराष्ट्र कचरा मुक्त करूया. स्वच्छ, सुंदर करूया. आरोग्य आणि समृद्धीला गवसणी घालूया. स्वच्छतेचा जागर करूया,” “एक तारीख एक तास” हे अभियान यशस्वी करूयात..” अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App