रामभाऊ म्हाळगी यांच्या अपघातग्रस्त नातवाच्या मदतीला धावले मुख्यमंत्री!

प्रतिनिधी

पुणे : जनसंघाचे माजी खासदार स्व. रामभाऊ म्हाळगी यांचे नातू केदार म्हाळगी यांना अपघात झाल्यानंतर त्यांना मदतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केली आहे. केदार
यांना दि १२ ऑगस्ट रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यानंतर अवघ्या सहा दिवसातच त्यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली.Chief Minister rushed to help Rambhau Mhalgi’s accident victim’s grandson



एकीकडे घरामध्ये आनंद निर्माण झालेला असतानाच दुसरीकडे मात्र या अपघाताने म्हाळगी कुटुंब पूर्णता हवालदिल झाले होते. त्यांच्यावर पिंपरी चिंचवड येथील वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शस्त्रक्रिया आणि उपचाराचा खर्च महागडा असल्याने नातेवाईकांच्या मदतीने म्हाळगी परिवाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संपर्क साधला.

संबंधित हॉस्पिटल मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मध्ये अंगीकृत नसल्याने राज्य शासनाकडून तात्काळ आर्थिक मदत करण्यात तांत्रिक अडचणी होत्या. पण या अडचणीतूनही मार्ग काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपले पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून तात्काळ वतीने 2 लाख रुपयांची मदत केली.

भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे यांच्या उपस्थितीत वेदांत हॉस्पिटलमध्ये हा मदत निधीचा चेक सुपूर्त करण्यात आला. संबंधित रुग्णालय लवकरात लवकर मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मध्ये अंगीकृत करण्यात येईल आणि उर्वरित उपचाराचा खर्च त्यातून करण्यात येईल, असे आश्वासन चिवटे यांनी या वेळी दिले.

अपघाताची बातमी समजताच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्री. म्हाळगी यांच्या कुटुंबियांशी दूरध्वनीवरून संवाद साधत आस्थेवाईकपणे चौकशी केली.

Chief Minister rushed to help Rambhau Mhalgi’s accident victim’s grandson

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात