Chhatrapati Sambhajinagar :छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेसाठी राज्य सरकारचे सहाय्य!

Chhatrapati Sambhajinagar

पाणीपुरवठा योजनेत 1808 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे


विशेष प्रतिनिधी

मुंबई : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेसंदर्भात उपमुख्यमंत्री फडणवीस(Devendra Fadanvis ) यांनी आढावा बैठक घेतली. छत्रपती संभाजीनगर( Chhatrapati Sambhajinagar )शहर पाणीपुरवठा योजनेतील कामांसाठी तातडीने निधी देऊन अडचणी दूर करण्याबाबत चर्चा केली.

छत्रपती संभाजीनगर येथील नागरिकांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनेतील कामे जलद गतीने पूर्ण होण्यासाठी महानगरपालिकेच्या वाट्याच्या निधीसाठी राज्य सरकारकडून कर्ज तत्वावर निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यासाठी येत्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव सादर करून निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती यावेळी फडणवीसांनी दिली.



पाणीपुरवठा योजनेत 1808 कोटी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत शहरात एकूण 50 जलकुंभ उभारण्यात येत आहेत. यामध्ये 47 उभे जलकुंभ व 3 बैठे पूर्ण करण्यात येणार आहेत. 600, 900 व 1200 मिलिमीटर व्यासाच्या पाईपलाईनची कामे देखील पूर्ण होत आहेत. तसेच पाणीपुरवठा योजनेंतर्गत जॅकवेलची कामे, जलशुद्धीकरण प्रकल्प, जलकुंभ, पाणी वितरण यंत्रणा यासारखी कामे पूर्णत्वास येत आहेत. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री अतुल सावे, आमदार संजय शिरसाट तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Chhatrapati Sambhajinagar city water supply scheme

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात