विशेष प्रतिनिधी
पुणे : शरद पवारांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीने आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना फक्त सत्तेची चटक लावली ही चटक पवार परिवारालाच महागात पडली सत्तेची चटक लावल्याचे बसले चटके अजितदादांच्या फोटोला पुण्यात मारले जोडे हे आंदोलन छगन भुजबळांच्या समर्थकांनी पुण्यात केले त्यामुळे अजित पवारांचे कार्यकर्ते भडकले आणि त्यांनी प्रति आंदोलन करण्याचा इशारा दिला. chhagan bhujbal
छगन भुजबळ यांना शरद पवारांपासून अजित पवारांपर्यंत दोन्ही राष्ट्रवादीने अनेकदा मंत्री केले दोनदा उपमुख्यमंत्री केले. त्यातून त्यांच्या सकट अनेक नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना पवारांनी सत्तेची चटक लावली. राजकारण करायचे तर सत्ताच हवी मग विकासाच्या नावाखाली वाटेल ते करता येते असा समज या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनामध्ये पवारांनीच पक्का रुजविला. त्याचीच फळे आज अजित पवारांच्या फोटोला पुण्यात चाखायला लागली. छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या फोटोला जोडे मारले.
भुजबळांना फक्त अजित पवारांनी एकदा मंत्री पद नाकारले म्हणून भुजबळ संतापले त्यांनी अजित पवारांच्या प्रफुल्ल पटेल यांच्या आणि सुनील तटकरे यांच्या कार्यशैलीचे सगळे वाभाडे काढले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये हे तिघेच फक्त निर्णय घेतात बाकीच्यांना हातातले खेळणे समजतात, अशा आरोपांच्या फैरी भुजबळांनी झाडल्या. मात्र बुधवारी ते काहीसे नरमले त्यांनी घटनात्मक पद्धतीने आंदोलनाची भाषा सुरू केली, पण तोपर्यंत भुजबळांच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या फोटोला जोडे मारून घेतले होते.
भुजबळांना फक्त एकदा मंत्री पद नाकारले म्हणून लगेच त्यांनी तो ओबीसी अस्मितेचा प्रश्न करून टाकला. जणू काही भुजबळांना मंत्रिपद मिळाले नाही, तर समस्त ओबीसी वर्गालाच काही कोणी दिले नाही, असा समज भुजबळ समर्थकांनी पसरविला. त्यातूनच ते जोडे मारा आंदोलन झाले, पण यामागे पवारांनी राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीच्या नेत्यांना सत्तेची लावलेली चटकच कारणीभूत ठरली. किंबहुना सत्तेच्या चटकेचे चटके अजित पवारांच्या फोटोला जोड्यांच्या रूपाने बसले. आता म्हणे, अजितदादा + प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे नाशिकला येऊन छगन भुजबळांची समजूत काढणार आहेत,
पण दरम्यानच्या काळात अजितदादांच्या समर्थकांनी देखील भुजबळांना दमबाजी करून घेतली. chhagan bhujbal
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App