दारिद्रय निर्मूलनाचे स्वप्न दाखवणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने आणिबाणीच्या काळात राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस आली, याचे भारतावर दूरगामी परिणाम झाले. आणिबाणी हे काँग्रेसचं लोकशाही पायदळी तुडवण्याचं लांच्छनास्पद कारस्थान असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. Chandrakant Patil alleges that the Indian economy has collapsed due to economic policies during the Emergency
विशेष प्रतिनिधी
पुणे : दारिद्रय निर्मूलनाचे स्वप्न दाखवणाºया इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने आणिबाणीच्या काळात राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस आली, याचे भारतावर दूरगामी परिणाम झाले. आणिबाणी हे काँग्रेसचं लोकशाही पायदळी तुडवण्याचं लांच्छनास्पद कारस्थान असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
देशात आणिबाणी जाहीर झाल्याच्या घटनेला शुक्रवारी ४६ वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी ट्विटद्वारे काँग्रेसवर टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, गरीबी हटावच्या घोषणा हवेतच विरल्या. दारिद्रय निर्मूलनाचे स्वप्न दाखवणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने या काळात राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस आली. याचे भारतावर दूरगामी परिणाम झाले.
तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतीय अर्थव्यवस्था संपूर्णरित्या उध्दस्त केली, अर्थचक्राची गती मंदावली, बेरोजगारी वाढली. सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले. गरिबी हटाव अशी घोषणा देणाऱ्या इंदिरा गांधींनी प्रत्यक्षात मात्र गरिबी बढावच्या दिशेनेच कृती केली.
संविधानाला धक्का लावणाऱ्या आणि प्रशासनाच्या जबाबदाऱ्या कमी करणाऱ्या ५ प्रमुख घटनादुरुस्ती संसदेत सत्ताबळाचा वापर करून मंजूर करण्यात आल्या. ३८व्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून २५ जून १९७५ रोजी करण्यात आलेल्या आणीबाणीच्या विध्वंसक घोषणेला न्याययंत्रणेच्या चौकटीतून वगळण्यात आले असेही चंद्रकांत पाटील यांनी ट्विट केलेल्या फोटोत म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App