55 कोटी रुपयांच्या बोगस पावत्याद्वारे बनावट ITC मिळवण्या प्रकरणी CGST भिवंडी आयुक्तालयाकडून दोन जणांना अटक


प्रतिनिधी

मुंबई : केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) आयुक्तालयाच्या मुंबई विभागातील भिवंडी शाखेने, बोगस जीएसटी पावत्यांची दोन प्रकरणे उघडकीला आणली आहेत. यामध्ये 55 कोटी रुपये किमतीच्या बोगस पावत्यांच्या मदतीने अंदाजे 23 कोटी रुपयांचा बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC), दावा केल्याचे उघडकीला आले आहे. या प्रकरणी सीजीएसटी कायद्या अंतर्गत, मेसर्स एम. एम. बिल्डकॉन/लंबोदर बिल्डकॉनचे मालक आणि मेसर्स विश्वकर्मा एंटरप्रायझेसचे मालक या दोन व्यक्तींना 18.08.22 रोजी अटक करण्यात आली आहे.CGST Bhiwandi Commissionerate arrests two persons in case of obtaining fake ITC through bogus receipt of Rs 55 crore

विशिष्ट माहितीच्या आधारे सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाच्या कर-चुकवेगिरी विरोधी शाखेने या दोन कंपन्यां विरोधात तपास सुरु केला. या तपासामध्ये दोन्ही कंपन्या अस्तित्वात नसल्याचे/बोगस असल्याचे आढळून आले. अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकांनी आपल्या जबाबामध्ये फसवणूक आणि कर-चुकवेगिरी केल्याचे कबूल केले. त्यांनी 23 कोटी रुपये इनपुट टॅक्स क्रेडीटचा दावा करत या अस्तित्वात नसलेल्या/बोगस/अवैध कंपन्या/बनावट कंपन्यांच्या बोगस पावत्यांद्वारे तो वळवला.तपासा दरम्यान गोळा करण्यात आलेल्या भौतिक पुराव्यांच्या आधारे दोन्ही कंपन्यांच्या मालकांना सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 132 चे उल्लंघन केल्याबद्दल सीजीएसटी कायदा, 2017 च्या कलम 69 अंतर्गत 18.08.2022 रोजी अटक करण्यात आली.

हे प्रकरण सीजीएसटी मुंबई विभागाने कर-चुकवेगिरी करणारे आणि बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट (ITC) यंत्रणे विरोधात उघडलेल्या विशेष मोहिमेचा भाग आहे. सीजीएसटी भिवंडी आयुक्तालयाने गेल्या एका वर्षात केलेली ही 15 वी आणि 16 वी अटक आहे.

संभाव्य कर-चुकवेगिरी करणाऱ्यांना ओळखण्यासाठी आणि त्यांचा शोध घेण्यासाठी सीजीएसटी अधिकारी डेटा (विदा) विश्लेषण आणि यंत्रणा विश्लेषण साधनांचा वापर करत आहेत. कर-चुकवेगिरी करणाऱ्यांच्या विरोधातील ही मोहीम येत्या काही दिवसांत सीजीएसटी अधिकारी आणखी तीव्र करणार आहेत.

CGST Bhiwandi Commissionerate arrests two persons in case of obtaining fake ITC through bogus receipt of Rs 55 crore

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात