कोविड केअर सेंटर चालविणाऱ्या रुग्णालयाकडून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या प्रथितयश दैनिकाच्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Case has been registered against a journalist who demanded a ransom of Rs 5 lakh from the hospital
विशेष प्रतिनिधी
पुणे : कोविड केअर सेंटर चालविणाऱ्या रुग्णालयाकडून पाच लाखांची खंडणी मागणाऱ्या प्रथितयश दैनिकाच्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुहास संभाजी भाकरे असे या पत्रकाराचे नाव आहे. फॉरच्यून स्पर्श हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड स्पर्श हॉस्पिटल या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अमोल अशोक होळकुंदे यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाणे फिर्याद दिली आहे.
फॉरच्यून स्पर्श हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेडकडे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ऑटोक्लस्टर येथील कोविड सेंटर चालविण्याची जबाबदारी आहे. भाकरे याने स्पर्श हॉस्पीटलच्या डॉक्टर व संचालकांशी संपर्क साधला.
माझी आर्थिक मागणी पूर्ण करा अन्यथा मी तुमच्या संस्थेच्या विरोधात रान उठवेन. तुमच्या संस्थेचे कॉन्ट्रॅक्ट बंद पडण्यास भाग पाडेन, असे आरोपीने धमकावले. संस्थेचे संचालक विनोद आडसकर हे ऑटोक्लस्टर येथे असताना त्यांना व्हाट्सअपवर मेसेज पाठवला.
मी कॉल सेंटर बाबत तक्रारी करीत आहे व तुमची बिले अडकून ठेवीन, असा धमकीवजा मेसेज पाठवला. त्यानंतर डॉ. अमोल होळकुंडे महापालिकेत गेले असताना भाकरेने त्यांच्याकडे पाच लाख रुपये खंडणी मागितली.
भीतीपोटी भाकरेंच्या संस्थेने पाच लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार महापालिकेच्या बाहेर रोख स्वरूपात दोन लाख रुपये दिले. तसेच फियार्दीच्या स्पर्श हॉस्पीटलच्या खात्यावरून आरोपीच्या भाकरेच्या नावावर तीन लाख रुपयांची एनएफटी केली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App