चोहोबाजूने टीकेचे मोहोळ उठल्यावर अजित पवारांना उपरती, इमेज मेकींगसाठीच्या संस्थेचे कंत्राट रद्द


स्वत:ची इमेज सुधारण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर सहा कोटी रुपयांचा भार टाकण्याचा अजित पवार यांचा घाट चोहोबाजूने टीकेचे मोहोळ उठल्याने उधळला गेला. इमेज मेकींगसाठीच्या संस्थेचे कंत्राट रद्द करण्यासह याबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे.Ajit Pawar’s contract for image making canceled after criticism from all quarters


विशेष प्रतिनिधी

मुंबई : स्वत:ची इमेज सुधारण्यासाठी राज्याच्या तिजोरीवर सहा कोटी रुपयांचा भार टाकण्याचा अजित पवार यांचा घाट चोहोबाजूने टीकेचे मोहोळ उठल्याने उधळला गेला. इमेज मेकींगसाठीच्या संस्थेचे कंत्राट रद्द करण्यासह याबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे.

उपमुख्यमंत्री कार्यालयाचा सोशल मिडीया सांभाळण्यासाठी बाह्ययंत्रणा नियुक्त करण्याची बिलकूल गरज नाही, यासंदभार्तील शासननिर्णय तात्काळ रद्द करावा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.



उपमुख्यमंत्री कार्यालयाला समाजमाध्यमांवर स्वतंत्रपणे कार्यरत राहण्याची गरज वाटत नाही. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या माध्यमातून शासकीय जनसंपकार्ची जबाबदारी पार पाडणे

शक्य असताना उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समाजमाध्यमांची जबाबदारी बाह्ययंत्रणेवर सोपवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सद्यस्थितीत उपलब्ध जनसंपर्क व्यवस्थेद्वारेच यापुढेही नागरिकांशी, प्रसिद्धी माध्यमांशी संवाद ठेवण्यात येईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र समाज माध्यमयंत्रणा नियुक्त करण्यासाठीचा शासननिर्णय काल जारी झाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार हे अनावश्यक प्रसिद्धीपासून दूर राहत असल्यामुळे या शासन निर्णयाबद्ल आश्चर्य व्यक्त करण्यात येत होते.

मात्र, या निर्णयावर टीका होऊ लागल्याने अजित पवार यांनीच त्यांच्या कार्यालयासाठी स्वतंत्र सोशल मिडीया सांभाळणार्‍या यंत्रणेची गरज नसल्याचे स्पष्ट केल्याने यासंदभार्तील शासन निर्णय रद्द करण्यात येणार आहे.

Ajit Pawar’s contract for image making canceled after criticism from all quarters

महत्त्वाच्या बातम्या

 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात