विशेष प्रतिनिधी
दुबई : दुबईवरून बुलढाण्यात परतलेल्या ६५ वर्षीय गृहस्थाची ओमायक्रॉन चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. संबंधित रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्यांना कुठलीही लक्षणे नसली तरी त्यांना १४ दिवस निरीक्षणात ठेवण्यात येणार नाही. Buldhana district The first omikron patient Found
दिलासादायक बाब म्हणजे संबंधित व्यक्तीच्या संपर्कातील सर्व व्यक्ती कोरोना निगेटीव्ह आहेत. मागील ९ डिसेंबर रोजी दुबईवरून आलेले हे गृहस्थ कोरोना पॉझिटीव्ह आढळले होते. त्यानंतर त्यांचा स्वॅब नमुना पुणे येथे ओमायक्रॉन चाचणीसाठी पाठविला होता.
आज त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह प्राप्त झाला आहे.त्यांच्यावर जिल्हा कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे,तरी बुलढाणेकरांना घाबरण्याची गरज नाही.कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन तहसिलदार रुपेश खंडारे यांनी केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App