Nitesh Rane : हिरव्या सापांना जवळ केल्याने ठाकरे ब्रँड संपला, नितेश राणे यांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Nitesh Rane

विशेष प्रतिनिधी

मुंबई : Nitesh Rane ठाकरे हा ब्रँड बाळासाहेब ठाकरेंच्या नावामुळे होता. यांनी हिरव्या सापांना जवळ करत हा ब्रँड संपवला आणि आता बोलत आहे. यात आमची काय चुकी? त्यांची चुकी आहे. त्यांनी हिंदुत्व सोडले. उबाठामध्ये केवळ आदित्य ठाकरे,उद्धव ठाकरे राहणार आहेत, असा हल्लाबोल भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे. Nitesh Rane

सामनामध्ये उद्धव ठाकरेंच्या ब्रँड ठाकरे मुलाखतीवर राणे म्हणाले, उबाठा इतकी जिहादीच्या प्रेमात आहे की लोकसभेला त्यांचे उमेदवार निवडून आले तेव्हा पाकिस्तानचे झेंडे कसे फडकवले गेले. विजयी उमेदवारांच्या मिरवणुकीत जिहादी नारे कसे दिले गेले. हिरवे झेंडे कसे फडकवले गेले? मराठी सक्ती तर आमच्या राज्यात आहेच. आम्ही काय मराठी नाही का? पाकिस्तान वरुन आलो आहोत का? पण खरा व्हिलन जो आहे त्याला तुम्ही ओळखा अशी टीका करत राणे म्हणाले , त्यांना आपण प्रश्न विचारला पाहिजे. हिंदी सक्तीला कुणाला जबाबदार धरायचे असेल तर ते उद्धव ठाकरेंना धरा, त्यांच्याविरोधात मोर्चे काढा. हिंदी सक्तीच्या नावाने उद्धव ठाकरे उर्दु सक्तीचा मार्ग मोकळा करत होते. Nitesh Rane



दुबे चुकले हे आम्ही पण बोलत आहोत, आशिष शेलार यांनी सभागृहात दुबे यांचे वक्तव्य चुकीचे असल्याचे म्हटले आहे. कुणीही त्यांचे समर्थन करत नाही. पण काल जी सभा घेतली ती मीरा रोडच्या नया नगरमध्ये घ्यायला हवी होती. तिथे चूकूनही कुणी मराठी बोलत नाही. नया नगरचे लोकं डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान पण मानत नाही. कोरोनाच्या काळात या परिसरात शरिया कायदा लागू होता. तेव्हा तिथल्या लोकांनी मास्क लावला नाही, हम कोरोना मानते नही म्हणत होते. तिथे शरिया कायदा लागू आहे. नया नगरच्या गोल टोपी वाल्याचे माझ्याकडे व्हिडिओ आले आहेत की मराठी बोलणार नाही, हात उचलला तर आम्हीही हात उचलू. गरीब हिंदूंना धमक्या देण्यापेक्षा तिथे जाऊन धमक्या द्या ना. त्यांना मराठी शिकवा, असे त्यांनी मनसेला सुनावले.

नीतेश राणे म्हणाले की, हिंदू समाजाला ही लोकं कुत्रा म्हणत आहे. यांच्या तोंडून कधी मराठी निघणार? यांना आम्हाला धमकी देण्याची सुट देण्यात आली आहे का? यांना आपल्या राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे, हिंदू समाजाला संपवायचे आहे, यांना कुणी बोलत नाही. नया नगरमध्ये कुणी मराठी बोलायला लावत नाही. आणि उगाच गरीब हिंदू लोकांना मारायचे. हिंदूंनी आपापसात का भांडायचे, ह्या नया नगर आणि भेंडी बाजारमधील लोकांना आनंद होत रहावा म्हणून का? शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करा. तिथे आतंकवादी घडवण्यापेक्षा दुसरे काहीच होत नाही. बुलडाण्यातील मदरशामध्ये यमनचे नागरिक लपले होते. मदरसे बंद करा ते सर्व आतंकवाद्याचे अड्डे बनले आहेत. देशाला जिहाद्याकडून धोका आहे. त्यांना देश इस्लामिक करायचा आहे, त्यामुळे एकत्र राहणे गरजेचे आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची काल मीरा भाईंदर येथे सभा झाली. या सभेचा संदर्भ देऊन राणे म्हणाले, माझा भाऊ, माझा भाऊ सुरू आहे तर सामनामध्ये त्यांच्या सभेची बातमी का छापली नाही. इतकेच बंधू प्रेम का? त्यामुळे खरा शकुनी मामा कोण हे तुम्ही समजून घ्या, तो मातोश्रीवर बसलेला आहे,

Bringing green snakes closer ended the Thackeray brand, Nitesh Rane attacks Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात