प्रतिनिधी
मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या 3 जूनच्या अयोध्या दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या शहरातून 10 ते 12 रेल्वे गाड्यांचे बुकिंग करण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना मनसे नेत्यांनी पत्र देखील पाठवले आहे.Booking of 10 to 12 trains for Raj Thackeray’s visit to Ayodhya; Welcome board in Ayodhya too
त्याचबरोबर अयोध्या दौऱ्याचे नियोजन वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू असून आजच्या संदर्भात बैठक राज ठाकरे यांनी शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानी घेतली. त्यामध्ये मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर आदी शहरांमधून मनसे कार्यकर्त्यांना अयोध्या घेऊन जाण्यासाठी रेल्वे गाड्यांचे विशेष बुकिंग करण्यात येत आहे. या संदर्भात चे पत्र रावसाहेब दानवे यांना पाठवण्यात आले आहे.
त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना राज ठाकरे यांच्या सुरक्षेबाबत पत्र पाठवण्यात आले आहे. राज ठाकरे यांच्या “चला अयोध्येला” या आवाहनाची पोस्टर्स वेगवेगळ्या शहरात लागली असून अयोध्येत देखील महेश कदम राज ठाकरे यांच्या स्वागताचे फलक लावले आहेत.
राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिन 1 मे रोजी संभाजीनगर मध्ये सभा होणार आहे, तर 3 मे रोजी अक्षय तृतीये दिवशी राज्यभरात महाआरती आणि हनुमान चालीसाचे सार्वजनिक वाचन असे कार्यक्रम मनसेने आयोजित केले आहेत. या दोन्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने मनसे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा भरपूर प्रचार करून घेणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App