हिंदुत्व कर्मकांडवर आधारित नाही तर ते भारतीय जीवन पद्धतीशी जोडले गेलेले आहे. अनेक पक्षांनी हिंदुत्वाची शाल पांघरलेली असेल पण आम्ही कोणती शाल पांघरलेली नाही कारण आमच्या रक्तातच हिंदुत्व आहे असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
विशेष प्रतिनिधी
पुणे- हिंदुत्व कर्मकांडवर आधारित नाही तर ते भारतीय जीवन पद्धतीशी जोडले गेलेले आहे. अनेक पक्षांनी हिंदुत्वाची शाल पांघरलेली असेल पण आम्ही कोणती शाल पांघरलेली नाही कारण आमच्या रक्तातच हिंदुत्व आहे. आम्ही ज्यांना हे बोललो आहे त्यांना ते समजले आहे. कोराना काळात भारताने लस जगाला पुरवली ही क्षमता आमच्यात निर्माण झाली आहे. रशिया आणि युक्रेन युद्धात अमेरिकेच्या परराषट्रमंत्री यांच्या डोळ्यात डोळे घालून आम्ही भारताचे हित पाहणार हे सांगण्याची देशाची ताकद निर्माण झाली आहे असे मत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.We don’t need to wear Hindutva Stoll because hindutva in our blood says Devendra Fadanvis
‘भाजप: काल आज आणि उद्या’ या मल्हार पांडे यांनी मराठीत अनुवाद केलेल्या ग्रंथाचे प्रकाशन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मॅाडर्न कॅालेज ॲाडिटोरीयम येथे करण्यात आले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांत पाटील, पुण्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर, भाजयुमोचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आ.राम सातपुते ,आमदार प्रशांत परिचारक ,आमदार सिद्धार्थ शिरोळे, जगदीश मुळीक ,शांतनू गुप्ता ऋतुपर्ण कुलकर्णी , अमृता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, एखाद्या पक्षाचा हा केवळ विचार नाही तर शाश्वत विचार अमलात आणण्याचा हा इतिहास आहे. ज्या ज्या वेळी आम्ही पारतंत्र्यात गेलो तेव्हा राज्यकर्त्यांनी तो इतिहास नष्ट करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळेच हा विचार वेगळ्या पद्धतीने रुजवण्यासाठी डॉ केशव हेडगेवार, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी प्रयत्न केले. अनेक वर्ष आम्ही जो विचार मांडला तो अमलात येऊ शकतो
हे अटलजी यांनी दाखवून दिले. भाजप स्वबळावर सत्तेत आल्यावर कलम ३७० रद्द करून दाखवू, अयोध्या मध्ये राम मंदिर करू, समान नागरिक कायदा आणू हे अटलजी यांनी सांगून ठेवले आणि त्याची अंमलबजावणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. आर्य बाहेरून आले ही थेअरी मुद्दाम पुढे आणण्यात आली हेच आम्ही अनेक वर्ष शिकलो.
परंतु आपल्या इतिहासकारांनी ही बाब चुकीची आहे हे संशोधन मधून पुढे आणले आणि डाव्या विचार संघटनेचे इतिहास तज्ञ त्यामुळे उघड पडले.संशोधनात सर्व भारतीयांचा एकच डीएनए असल्याचे स्पष्ट झाले आहे. ऋग्वेद नऊ ते साडेनऊ हजार वर्षापूर्वी लिहिण्यात आले ही बाब संशोधनात पुढे आली असून भारतीयांनी जगाला दिशा देण्याचे काम केले.
पाटील म्हणाले, भाजप बाबत राजकीय अज्ञान आहे, अनेकांना हा पक्ष १९८० साली स्थपान झाली असे काही महाभागांना वाटते. ज्यांना पक्ष काल मोठा झाला असे वाटते, गावोगावी नेली असे म्हणतात. एक खोटे सकाळी बोलले की दुसऱ्याने त्यावर प्रतिक्रिया द्यायची आणि दिवसभर ते प्रसारमाध्यम द्वारे प्रसारित करून ती बाब जाणीवपुर्वक खरे असल्याचे बिंबवले जात आहे.
हिंदू विचार कोणी नव्याने मांडला नाही. पाच हजार वर्षांपासून हिंदू परंपरा इतिहास आहे. तो मुर्तिशी जोडलेला नाही तर संस्काराशी जोडलेला आहे. भगवा कोणाला पेटंट दिलेला नाही. मंडल अध्यक्ष पर्यंत हे पुस्तक पोचवण्याकरीता या पुस्तकाच्या एक हजार प्रती आम्ही पक्षासाठी विकत घेतो आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more