कोकणात गणेशोत्सवासाठी बुकिंग फुल्ल; आता आणखी जादा गणपती विशेष रेल्वेगाड्या!!


प्रतिनिधी

मुंबई : गणेशोत्सवाला कोकणात विशेष महत्त्व आहे. त्यामुळे अनेक चाकरमनी गणेशोत्सवासाठी कोकणाची वाट धरतात. याच पार्श्वभूमीवर कोकण रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले होते. या गाड्यांचे बुकिंग फुल्ल झाल्याने तसेच गणपती उत्सव २०२२ दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस आणि ठोकूर दरम्यान अतिरिक्त गणपती विशेष गाड्या चालवणार आहे.Booking full for Ganeshotsav in Konkan; Now more extra Ganpati special trains

कोकणात जाण्यासाठी विशेष गाड्या

01153 ही विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक १३ ऑगस्ट २०२२ ते ११ सप्टेंबर २०२२ (३० सेवा) पर्यंत दररोज २२.१५ वाजता सुटेल आणि ठोकूर येथे दुसऱ्या दिवशी १६.३० वाजता पोहोचेल.



01154 ही विशेष गाडी दिनांक १४ ऑगस्ट २०२२ ते १२ सप्टेंबर २०२२ (३० सेवा) दरम्यान ठोकूर येथून दररोज १९.३० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगांव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवलीf , राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी, मडगाव, कारवार, गोकर्ण रोड, कुमटा, मुरुडेश्वर, भटकळ, मूकांबिका रोड बैन्दूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की, सुरतकल.

संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, 4 तृतीय वातानुकूलित, १२ शयनयान, २ लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅनसह ७ सामान्य द्वितीय श्रेणी.

आरक्षण : विशेष गाडी क्र. 01153/01154 चे विशेष शुल्कासह बुकिंग ९ जुलै पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरु होईल. या विशेष ट्रेनच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. प्रवाशांना स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला दिला जात आहे.

Booking full for Ganeshotsav in Konkan; Now more extra Ganpati special trains

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात