महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युतीच्या शिंदे फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ ठरवताना जेवढी खेचाखेच दस्तूर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होत नाही, तेवढा सावळा गोंधळ मराठी माध्यमांचा होताना दिसत आहे. किंबहुना वर शीर्षकात दिल्याप्रमाणे, “दुबळे यांचे सोर्सेस, फसवी यांची भाषा आणि मराठी माध्यमांचा बौद्धिक तमाशा” हेच वास्तव आहे!! मंत्रिमंडळ बनवताना शिंदे – फडणवीसांमध्ये रस्सीखेच अशा बातम्या देताना खुद्द मराठी माध्यमांचीच चढाओढ लागली आहे!!Shinde Fadanavis government : all media including marathi media confused over news as their sources are very poor in nature
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ते स्वतःच मुख्यमंत्री बनणार याची साधी भनकही मराठी माध्यमांना लागली नव्हती. एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या 8-10 दिवसांच्या काळात मराठी माध्यमे छातीठोकपणे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार अशा बातम्या ठोकून देत होती. महाराष्ट्रात तशी वातावरण निर्मिती ही त्यांनी केली होती. परंतु प्रत्यक्षात घडले काय??, तर शेवटच्या क्षणी पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करेपर्यंत मराठी माध्यमांना याची कल्पनाच नव्हती की ते स्वतः नव्हेत तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनणार आहेत!! त्यापुढचे सरप्राईज एलिमेंट मराठी माध्यमांसाठी तर मोठा धक्का होते, ते म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात आपण जाणार नाही.
आपण बाहेरून सरकारला पाठिंबा देऊ सरकार मजबुतीसाठी प्रयत्न करू, असे पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस यांनी अखेर उपमुख्यमंत्री पद स्वीकारले. भाजप श्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारायला लावले. याची साधी बातमी देखील मराठी माध्यमांना आधी कळली नव्हती. भाजपच्या केंद्रीय पातळीवरच्या आणि प्रदेश पातळीवरच्या सर्वोच्च नेत्यांमध्ये मराठी माध्यमांचे अजिबात विश्वसनीय सोर्सेस नाहीत हे एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या सर्व बातम्यांच्या पार्श्वभूमीवर ठळकपणे सिद्ध झाले.
मुख्यमंत्री या नात्याने पदभार स्विकारल्यानंतर आज उपमुख्यमंत्री श्री.@Dev_Fadnavis यांच्यासोबत दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री श्री.@AmitShah यांची भेट घेतली. यासमयी त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल ती मदत केंद्र सरकार नक्कीच करेल असे मला आश्वस्त केले.#MaharashtraFirst pic.twitter.com/9A9xg0qjQc — Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 8, 2022
मुख्यमंत्री या नात्याने पदभार स्विकारल्यानंतर आज उपमुख्यमंत्री श्री.@Dev_Fadnavis यांच्यासोबत दिल्ली येथे देशाचे गृहमंत्री श्री.@AmitShah यांची भेट घेतली. यासमयी त्यांनी राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी लागेल ती मदत केंद्र सरकार नक्कीच करेल असे मला आश्वस्त केले.#MaharashtraFirst pic.twitter.com/9A9xg0qjQc
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 8, 2022
आता त्यापलिकडे शिंदे – फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर मंत्रिमंडळ रचनेच्या बातम्या मराठी माध्यम देत आहेत. त्याच्यात सुद्धा एकाचढ एक पतंग उडवत आहेत. वेगवेगळे फॉर्म्युले स्वतःच्याच बौद्धिक कुवतीनुसार मराठी माध्यमे सादर करीत आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात मंत्री पदांसाठी खेचाखेची, शिंदे गटाला 13 मंत्रिपदे मिळणार, भाजपला 28 मंत्री पदे मिळणार. गृहमंत्री, अर्थमंत्री, महसूल मंत्री, सहकार मंत्री पदासाठी रस्सीखेच आहे वगैरे बातम्या मराठी माध्यम देत आहेत. या सर्व बातम्या सूत्रांच्या हवाल्याने छातीठोकपणे दडपल्या जात आहेत. पण यातली वस्तुस्थिती काय आहे?? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात नेमकी चर्चा काय झाली आहे??, यातली एकही ओळ मराठी माध्यमिक खात्रीशीर सांगू शकलेली नाहीत!! काल शुक्रवारी म्हणजे 8 जुलै 2022 रोजी रात्री 9.30 वाजता सुरू झालेली चर्चा मध्यरात्री 2.00 वाजता संपली. परंतु 6 तास झालेल्या या चर्चेत नेमके काय घडले??, हे या तिघांनी कुणालाही सांगितलेले नाही. त्यामुळे ज्या बातम्या मराठी माध्यमे देत आहेत, त्यांच्यावर विश्वास किती ठेवायचा आणि त्यावर आधारित मंत्रिपदाचे मनसुबे किती रचायचे हे ज्याचे त्याने ठरवण्याची वेळ आहे!!
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांची प्रोटोकॉलनुसार भेट घेणार आहेत. त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. मोदींच्या भेटीत नेमके काय होते?, हे कोणीही सांगू शकणार नाही. जोपर्यंत एक तीन नेते स्पष्टपणे बोलत नाहीत तोपर्यंत कोणतीही बातमी खरी मानता येत नाही, हीच यातली वस्तुस्थिती आहे!!
– काँग्रेस मधले सोर्सेस तुलनेने पक्के होते
काँग्रेसचे रिपोर्टिंग करताना कुठला तरी काँग्रेस मधला सोर्स विश्वसनीय पातळीवर माहिती देत असे. ती माहिती बहुतांश खरी होत असे पण भाजपमध्ये असले सोर्सेस डेव्हलपच झालेले नाहीत. किंबहुना मोदी – शहा – नड्डा यांच्या भाजपमध्ये असे सोर्सेस डेव्हलपच होऊ दिलेले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे नुसती मराठी माध्यमेच नाहीत, तर हिंदी आणि इंग्रजी माध्यमे देखील तशाच अधांतरी बातम्या देताना दिसतात. त्यातली भाषा फार तर वेगवेगळी असू शकते पण आशयाच्या बाबतीत मात्र बाकीच्या भाषक माध्यमांचा मराठी माध्यमांसारखाच बौद्धिक तमाशा रंगलेला दिसतो!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App