अमरनाथ मध्ये ढगफुटी : 10 यात्रेकरू भाविकांचा मृत्यू; एनडीआरएफचे मदत कार्य वेगात


वृत्तसंस्था

श्रीनगर : अमरनाथच्या यात्रेला गेलेल्या तब्बल 10 ते 15 हजार भाविकांवर आज मोठे संकट कोसळले. अमरनाथमध्ये बाबा अमरनाथ गुहेजवळ अचानक ढगफुटी झाल्यामुळे हाहाकार माजला. त्यामध्ये 10 भाविकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 3 महिलांचा समावेश आहे Cloudburst in Amarnath 10 pilgrims die

या ढगफुटीमुळे गुहेजवळ पाण्याच्या प्रचंड प्रवाहात भाविकांचे तंबू वाहून गेले. या घटनेत आतापर्यंत 10 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 10 ते 15 हजार भाविक प्रभावित झाले आहेत. ते सध्या अमरनाथमध्ये अडकून पडले आहेत. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. घटनास्थळी एनडीआरएफ टीम पोहोचली आहे. बचावाचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीर केंद्रशासित प्रदेशाचे राज्यपाल मनोज सिंह यांच्याशी चर्चा करून एनडीआरएफच्या आणखी टीम पाठवण्याची व्यवस्था केली आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराच्या हेलिकॉप्टरची मदत घेतली आहे.

नेमकं काय घडलं?

जम्मू-काश्मीरच्या अमरनाथ येथे ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरनाथमध्ये होली गुहेजवळ संध्याकाळी 5.30 च्या सुमारास ढगफुटी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच तातडीने बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. विशेष म्हणजे सध्या अमरनाथची यात्रा सुरू आहे. या यात्रेदरम्यान ढगफुटीची धक्कादायक बातमी समोर आली. या ढगफुटीत काही भाविकांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

काश्मीर झोन पोलिसांनी या घटनेची माहिती दिली आहे. पाण्याच्या लोंढ्यात भाविकांचे काही तंबू वाहून गेले आहेत. पोलिसांनी केलेल्या बचावात आतापर्यंत दोन भाविकांचे मृतदेह सापडले आहेत. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. परिस्थिती नियंत्रणात आहे, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

Cloudburst in Amarnath 10 pilgrims die

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात