बॉलीवूडच्या परफेक्शनिस्ट ला ही “मन की बात” या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाची भुरळ..

वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत “मन की बात” या कार्यक्रमाचं भरभरून अमीर कडून कौतुक …

विशेष प्रतिनिधी

पुणे : ऑल इंडिया रेडिओ वरून दर रविवारी प्रसारित होणारा.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मन की बात हा कार्यक्रम.. येत्या रविवारी 100 भाग पूर्ण करणार आहे .. ऑल इंडिया रेडिओच्या इतिहासातील हा सर्वात लोकप्रिय कार्यक्रम ठरला आहे..
त्यानिमित्ताने आज दिल्लीत मन की बात @100 या एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं.. Bollywood perfectionist Aamir Khan appreciated All India Radio program man ki baat

या कार्यक्रमाचे उद्घाटन उपराष्ट्रपती जगदीश धनखड आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते झालं..

यावेळी बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट अमीर खानं याने पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत मन की बात या कार्यक्रमाचं कौतुक केलं … संवाद साधण्या साठीचं हे योग्य आणि प्रभावी माध्यम आहे.. पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या लोकांसोबत संवाद साधता चर्चा करतात, प्रश्न समजून घेतात..लोकांचा अभिप्राय जाणून घेतात त्यामुळे संवादाचं सगळ्यात प्रभावी माध्यम म्हणून मन की बात कडे बघितलं पाहिजे..

मन की बात या कार्यक्रमांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ज्यांचा उल्लेख केला असे शंभर सदस्य या परिषदेला उपस्थित राहिले आहेत.. या शंभर पैकी सात सदस्य हे महाराष्ट्रातील आहेत..

इतर रविवारी म्हणजेच 30 तारखेला या कार्यक्रमाचा शंभरावा भाग प्रसारित होणार आहे .. हा शंभरावा भाग विशेष असणारा असून , पंतप्रधान संवाद साधण्यासाठी कोणत्या विषयाची निवड करतात याकडे संपूर्ण जनतचं लक्ष लागलं आहे..

Bollywood perfectionist Aamir Khan appreciated All India Radio program man ki baat

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात