वृत्तसंस्था
पुणे : गौरीबरोबरच पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन मंगळवारी झाले. त्या नंतर आता रस्त्यावर गर्दी वाढत आहे. त्यामुळे पोलिसांनी रात्री दहानंतर शहरात नाकाबंदी लागू केली. त्यामुळे पुणेकरांना रात्री दहाच्या आत घरी परतावे लागणार आहे. Blockade in the city after ten at night; Pune residents will have to return home by 10 pm.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसर आणि शहराच्या मध्यवर्ती भागात मानाचे गणपती आहेत. त्यामुळे दर्शनासाठी गणेश भक्तांची गर्दी होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील मध्यवर्ती भागात कडक नाकाबंदी असून, दहानंतर वैध कारणाशिवाय फिरणाऱ्यांची चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.
गणेशोत्सवात मध्यवर्ती भागात गर्दी करू नका, असे आवाहन केले जात आहे. शहरातील सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी केली आहे. प्रत्येक पाॅईंटवर दहानंतर विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी होणार आहे. शहरातील टिळक रस्ता वाहतुकीसाठी मोकळा असून शहरातील मध्यवर्ती भागात जाताना मात्र, नागरिकांची चौकशी करण्यात येणार आहे.
शिवाजी रस्ता, बाजीराव रस्त्यावर वाहतूक बदल
मंगळवारी सायंकाळपासून पीएमपी बस तसेच जड वाहनांना स. गो. बर्वे चौकातून स्वारगेटकडे जाण्यास मनाई आहे. वाहनचालकांनी जंगली महाराज रस्ता, खंडुजीबाबा चौक, टिळक चौक, टिळक रस्तामार्गे पुढे जावे. स्वारगेटहून शिवाजीनगरला जाणाऱ्या बाजीराव रस्त्यावरील वाहतूक पुरम चौकातून वळविण्यात येईल. वाहने स्वारगेट, सारसबाग, पूरम चौक, टिळक रस्ता, टिळक चौक, खंडुजीबाबा चौक, फर्ग्युसन महाविद्यालय या रस्त्याने पुढे जाता येईल. नगर रस्त्यावरून स्वारगेट कात्रजकडे जाण्यासाठी पुणे स्टेशन येथून नेहरू रस्त्याने सेव्हन लव्ह चौकातून स्वारगेटकडे किंवा मार्केट यार्डकडे जाता येईल.
शहरातील मध्य वस्तीत गर्दी वाढत आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री दहानंतर नाकाबंदी केली आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची चौकशी करून त्यांना परत पाठविण्यात येत आहे. नागरिकांनी सहकार्य करून काळजी घ्यावी. घराबाहेर घोळक्याने फिरू नये.
– प्रियंका नारनवरे, पोलिस उपायुक्त, पुणे
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App