प्रतिनिधी
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर हिच्याशी जमीन व्यवहारात मनी लॉन्ड्रिंग करणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते, मंत्री नवाब मलिक यांचा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घ्यायचा आहे पण त्यांच्यावर दाऊदचा दबाव आहे, असा खळबळजनक दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केला आहे.BJP’s morcha tomorrow for the resignation of Nawab Malik
त्याच वेळी नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्यासाठी भाजप उद्या मुंबईत मोर्चा काढणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. नवाब मलिक यांच्यावर दाऊद इब्राहिम याच्याशी जमीन खरेदीचा व्यवहार केल्याच्या आरोपाखाली अटकेत आहेत. त्यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. मात्र तरीही ठाकरे सरकार मंत्री मलिक यांचा राजीनामा घेत नाही, त्यामुळे भाजप आता रस्त्यावर उतरणार आहे.
…तरीही मोर्चा काढणारच
ठाकरे सरकारने मलिक यांचा राजीनामा न घेण्याच्या मुद्यावर ठाम आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक बनले आहे. अर्थसंकल्पिय अधिवेशनाचे सुरूवातीचे दोन दिवस मंत्री मलिक यांचा राजीनामा मागितला पण त्याकडे सरकारने दुर्लक्ष केले, त्यामुळे अखेर भाजपने याकरता रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. याकरता भाजपाच्या वतीने ९ मार्च रोजी मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईत मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
सरकारवर दाऊदचा दबाव
या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाही दिली, तरी परवानगी झुगारून भाजप मोर्चा काढणार आहे. सरकारला नवाब मलिकांचा राजीनामा घ्यावाच लागेल. मलिकांचा राजीनामा का घेतला जात नाही. त्यांचा राजीनामा न घेण्याबाबत कुणाचा दबाव होता का? कदाचित मलिक यांचा राजीनामा घेऊ नये म्हणून दाऊदचा दबाव असेल असा माझा अंदाज आहे, असा खोचक टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांचे व्यक्तीमत्व पाहता त्यांना मलिक यांचा राजीनामा घ्यायचा आहे, पण त्यांच्यावर दबाव आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. काहीही झाले तरी भाजपचा मोर्चा निघणारच. परवानगी मिळो अथवा न मिळो, असेही पाटील म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App