विशेष प्रतिनिधी
मुंबई : BJP जरांगे फॅक्टरला विधानसभा निवडणुकीत काटशह देण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहिणी योजनेसह वेगवेगळ्या महामंडळाच्या स्थापनेचे निर्णय घेतलेच. आता त्या निर्णयांचा विधानसभा निवडणुकीत प्रत्यक्ष उपयोग करण्यासाठी भाजपने तालुका गाव पातळीपर्यंत सोशल इंजिनिअरिंगच्या प्रयोगाचे पेनिट्रेशन केले असून समाज विविध समाज घटकांमधले 270 नेत्यांचे नेटवर्क प्रभावीपणे वापरण्याची रणनीती भाजपने आखली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि वरिष्ठ नेते शिवप्रकाश यांनी ऑनलाइन बैठक घेऊन संबंधित नेत्यांना सूचना दिल्या आहेत.BJP
तालुका आणि गाव पातळीवर वेगवेगळ्या समाजांवर प्रभाव असलेले हे 270 नेते आणि कार्यकर्ते भाजप सरकारने घेतलेल्या विविध सामाजिक निर्णयांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम करणार आहेत. यातून जरांगे फॅक्टरला काटशह देण्याचा भाजपचा इरादा आहे. मनोज जरांगे यांनी जरी उमेदवार देण्याची घोषणा केली असली, तरी अद्याप त्यांच्या उमेदवार यादीत स्पष्टता आलेली नाही. केवळ भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करणे आणि बाकीच्यांना मुक्त वाट करून देणे एवढीच जरांगे यांची स्ट्रॅटेजी समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर बूथ आणि मतदार यादी यावर पुन्हा एकदा भर देण्याचा निर्णय घेऊन भाजपने बूथचे ए, बी, सी, डी असे कॅटेगरायझेशन करून ए आणि बी बूथवर 10 ते 15 % मतदान वाढवण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले आहे. त्याची जबाबदारी कार्यकर्ता आणि बुधप्रमुख यांना नावे निश्चित करून दिली आहे. 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बूथ यंत्रणा काहीशी ढिल्ली पडली, असा भाजपच्या अभ्यासाचा निष्कर्ष आहे. त्यामुळे बूथ पातळीवरचे कार्यकर्ते पुन्हा ऍक्टिव्हेट करून मतदार यादीवर काम करणे प्रत्यक्ष मतदारांच्या भेटीगाठी घेऊन मतदानाचा टक्का वाढविणे हे या कामाला भाजपने रणनीतीच्या पातळीवर प्राधान्य दिले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App