महाराष्ट्रात आज तीन ठिकाणी तीन वेगवेगळी आंदोलने झाली. जालन्यात भाजपने जलआक्रोश मोर्चा काढला. राहुल गांधी यांच्या ईडी चौकशी प्रकरणात काँग्रेसने दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे आंदोलन केले, तर राष्ट्रवादीने अजितदादा पवारांच्या कथित अपमान विरोधात पुण्यात संत तुकाराम पादुका चौकात आंदोलन केले. BJP to Congress, NCP; Alleged insult to water and leaders
या तिन्ही आंदोलनांच्या तीन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. भाजपने जालन्यात जिल्हा आक्रोश मोर्चा काढला. या आंदोलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवी स आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे सहभागी झाले. त्यांनी ठाकरे – पवार सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने निधी देऊन सुरू केलेली मराठवाड्याची पाणी योजना बंद केल्याबद्दल ठाकरे – पवार सरकारला धारेवर धरले. मात्र मराठी प्रसारमाध्यमांनी आक्रोश मोर्चाच्या बातम्या सरळपणे देण्याऐवजी या मोर्चात पंकजा मुंडे सामील झाल्या नव्हत्या याच्या बातम्या जास्त मोठ्या प्रमाणावर दिल्या.
ओबीसी एम्पिरिकल डाटा : फडणवीसांच्या शंकेला भुजबळ, वडेट्टीवार यांचा दुजोरा!!; प्रकरणाचे नेमके गंभीर्य काय??
एकीकडे भाजपने असा जलआक्रोश मोर्चा काढलेला असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मात्र आपापल्या नेत्यांसाठी आंदोलने केली. नॅशनल हेराल्ड मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राहुल गांधींची सलग तिसऱ्या दिवशी ईडीने चौकशी केली. या चौकशी विरोधात काँग्रेसने दिल्लीपासून गल्लीपर्यंत आंदोलन केले.
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देहूमध्ये शिळा मंदिर उद्घाटनाच्या कार्यक्रमात पंतप्रधानांसमवेत सहभागी होऊनही भाषण करू दिले नाही. हा महाराष्ट्राचा अपमान झाला, असा आरोप करत राष्ट्रवादीने आंदोलन केले. अजित पवार यांचा अपमान झाल्याचा विषय खासदार सुप्रिया सुळे यांनी लावून धरल्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विशेष बळ मिळाले. तिन्ही पक्षांनी आपापल्या नैसर्गिक राजकीय प्रवृत्तीनुसार आंदोलनांमध्ये आपले राजकीय स्वभाव दाखवून दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App