अयोध्येत शिवसैनिकांसह शक्तिप्रदर्शन करून आदित्य ठाकरे म्हणाले, यात राजकारण नाही!!


वृत्तसंस्था

अयोध्या : राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे बुधवारी अयोध्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांनी शिवसैनिकांसह मोठे शक्तिप्रदर्शन करून अयोध्या दौऱ्यात राजकारण असल्याचे म्हटले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, रामलल्ला हा आमच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे आम्ही अयोध्येत प्रभू श्री रामाचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत. अयोध्या दौऱ्याचा महाराष्ट्रातील आणि देशाती राजकारणाशी कोणताही संबंध नाही. Demonstrating with Shiv Sainiks in Ayodhya, Aditya Thackeray said, there is no politics in this

आदित्य ठाकरे यांनी यांचे दर्शन घेतले आहे. यावेळी हजारो शिवसैनिक त्यांच्यासमवेत अयोध्येत पोचले आहेत.

शेकडो शिवसैनिकांनी विमानतळावर केले भव्य स्वागत

लखनऊ विमानतळावर दाखल होताच त्यांनी अयोध्या दौऱ्यावर प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले, आम्ही नेहमी अयोध्येत येत असतो. त्याप्रमाणे आताही आलो आहोत. पण यामध्ये कोणतेही राजकारण नाही. यावेळी आदित्य ठाकरेंचे स्वागत कऱण्यासाठी शेकडो शिवसैनिक विमानतळावर दाखल झाले होते. या शिवसैनिकांनी त्यांचे भव्य स्वागत केले. या स्वागतानंतर आदित्य ठाकरेंचा ताफा अयोध्येच्या दिशेने रवाना झाला. तसेच तेथे दाखल झाल्यानंतर ते इस्कॉन मंदिराला भेट देणार आहेत. रामलल्लाचं दर्शन घेतल्यानंतर ते संध्याकाळी शरयू तीरावर आरती करणार आहे.

Demonstrating with Shiv Sainiks in Ayodhya, Aditya Thackeray said, there is no politics in this

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात