दिल्ली – मुंबईत दिवसभर चर्चा पवारांचीच!!; पण “नकार” शब्दाभोवती फिरलेली!!


आज 14 जून 2022 वटपौर्णिमेच्या दिवशी दिवसभरात दिल्ली आणि मुंबई दोन पवारांची चर्चा रंगली होती… पण त्याचवेळी या चर्चेचे वैशिष्ट्य “नकार” या शब्दाभोवती केंद्रित होते!! Delhi – Pawar’s discussion all day in Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहूतील शिळा मंदिर उद्घाटन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू दिले नाही, या मुद्द्यावरून मुंबई आणि महाराष्ट्रात राष्ट्रवादीने जोरदार वाद घातला. पंतप्रधानांच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करू दिले नाही त्यामुळे प्रोटोकॉल तोडल्याची भाषा खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी केली त्यांना भाजपच्या अनिल बोंडे यांच्यासह अनेकांनी प्रत्युत्तर देखील दिले. पण चर्चा अजितदादांची होती!!

प्रत्यक्षात खाली राष्ट्रवादीचे नेते अजितदादांना भाषण करू दिले नाही, या विषयी वाद सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अजितदादा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना आपल्या हेलिकॉप्टरमध्ये एकत्र घेऊन मुंबईला पोहोचले. सुमारे पाऊण तास हे तीनही नेते हेलिकॉप्टरमध्ये एकत्र होते. या पुणे – मुंबई हेलिकॉप्टर प्रवासात तिन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचे तपशील या तीनही नेत्यांनी कोणाला सांगितले नाहीत. पण अजितदादांवर मुंबई आणि महाराष्ट्रात “अंदाज पंचे दाहोदर्से” अशी दिवसभर चर्चा होत राहिली!!

पवारांचा राष्ट्रपतीपदाला नकार

इकडे मुंबई आणि महाराष्ट्रात अजितदादांवर चर्चा घडत असताना तिकडे दिल्लीत राष्ट्रपती निवडणुकीच्या मुद्द्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी 6 जनपथ येथे जाऊन शरद पवारांशी चर्चा केली. सर्व विरोधकांचा सहमतीचा उमेदवार आपण बनावे, अशी गळ ममता बॅनर्जी यांच्यासह सर्व विरोधी पक्षांनी शरद पवारांना घातली आहे. परंतु लोकसभेत भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे प्रचंड बहुमत असताना आपण राष्ट्रपती पदावर निवडून येऊ शकत नाही हे लक्षात घेऊन शरद पवारांनी सर्व विरोधकांचा सहमतीचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार होण्यास नकार दिला आहे.

– पवार – ममताचा चर्चा

दिल्लीत उद्या ममता बॅनर्जी यांनी कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये सर्व विरोधी पक्षांची बैठक बोलावली आहे. त्याआधी शरद पवारांच्या नावावर डावे पक्ष, आम आदमी पार्टी, तृणमूल काँग्रेस, काँग्रेस या सर्व पक्षांचे एकमत झाले आहे. म्हणूनच ममता बॅनर्जी यांनी पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. परंतु, पवारांनी पराभूत होण्याच्या खात्रीतून विरोधकांचा राष्ट्रपतीपदाचा उमेदवार व्हायला नकार दिला आहे.

या अर्थाने आज दिवसभर दिल्ली आणि मुंबईत दोन पवारांचीच चर्चा होती… पण ती “नकार” या शब्दाभोवती केंद्रित झाली होती. एका पवारांना भाषण करू दिले नाही म्हणून चर्चा, तर दुसऱ्या पवारांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार व्हायला नकार दिला म्हणून चर्चा!!

Delhi – Pawar’s discussion all day in Mumbai

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात