औरंगाबाद पाणीप्रश्न : राज्यपालांनी मोदींसमोर समस्यांचा पाढा वाचल्याची मराठी माध्यमाची मखलाशी; पण ही तर दारूण वस्तुस्थिती!!


नाशिक : राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी राजभवनातल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर महाराष्ट्रातल्या विविध समस्यांचा पाढा वाचल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. Governer Bhagat singh koshiyari touched upon true problems of aurangabad water scarcity

मोदींच्या हस्ते जलभूषण इमारतीचे उद्घाटन आणि क्रांतिगाथा संग्रहालयाचे उद्घाटन राजभवनात आज 14 जून 2022 रोजी झाले.

भगतसिंह कोशियारी यांनी या कार्यक्रमात औरंगाबादच्या पाणी प्रश्नाचा उल्लेख केला तसेच महाराष्ट्रात वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त अडीच वर्षे रखडल्याचा उल्लेख केला हे खरे. परंतु त्यावरच आधारित लगेच मराठी माध्यमांनी राज्यपालांनी मोदींसमोर समस्यांचा पाढा वाचल्याच्या बातम्या दिल्या आहेत, त्या मात्र जरा जास्तच रंगसफेदी करून दिलेल्या दिसत आहेत!!

राज्यपालांनी “मोदी हे तो मुमकिन है” या विधानाचा आपल्या भाषणात उपयोग करून घेतला आणि तो उपयोग करून घेताना महाराष्ट्रातल्या काही समस्या पंतप्रधान मोदीच सोडवू शकतात, असे सांगितले. त्या समस्या म्हणजे औरंगाबादची पाणी समस्या किंवा वैधानिक विकास मंडळ यांच्या नियुक्त्या. गेली अडीच वर्षे ठाकरे – पवार सरकार सत्तेवर आल्यानंतर वैधानिक विकास मंडळ यांच्यावर नियुक्त्या झाल्या नाहीत. त्यामुळे राज्यपालांच्या वैधानिक कामांमध्ये अडथळे उत्पन्न होतात ही वस्तुस्थिती राज्यपालांनी पंतप्रधान मोदींसमोर जाहीररीत्या मांडली.

– औरंगाबादचा पाणी प्रश्न रखडलेलाच

त्याचबरोबर त्यापेक्षाही महत्त्वाचा औरंगाबादचा पाणी प्रश्न हा गेली अडीच वर्षे खरंच रखडला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने नियोजित केलेली योजना ठाकरे – पवार सरकारने गुंडाळून ठेवली. त्या योजनेला पर्यायी योजना देखील गेल्या अडीच वर्षांत दिली नाही ही दारूण वस्तुस्थिती असताना केवळ राज्यपालांनी आपल्या भाषणात या समस्येचा उल्लेख केल्याने मोदींसमोर त्यांनी तक्रारींचा पाढा वाचल्याची मखलाशी कशी काय होऊ शकते?? परंतु मराठी माध्यमांनी तशी मखलाशी केली आहे!!

मराठी माध्यमांनी खोचकपणे राज्यपालांनी मोदींसमोर तक्रारींचा पाढा वाचला अशा बातम्या दिल्या असल्या तरी ठाकरे – पवार सरकारची वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्ती बाबतची आणि औरंगाबादच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष केल्याची वस्तुस्थिती मात्र त्यामुळे लपून राहत नाही.

Governer Bhagat singh koshiyari touched upon true problems of aurangabad water scarcity

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात