महाराष्ट्रातील प्रमुख भाजप नेत्यांची सोमवारी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी भाजप नेत्यांची ही बैठक झाली. या बैठकीच्या पार्श्वभूमीवर काल वेगवेगळ्या विषयावर चर्चा करण्यात आली. अगदी मराठा आरक्षणापासून ते राज्यातील प्रदेशाध्यक्ष बदलापर्यंतच्या विषयांचा यात समावेश असल्याचे बोलले जात आहे. BJP to change state president of Maharashtra? See what Raosaheb Danve said
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी सोमवारी राज्यातील महत्त्वाच्या भाजप नेत्यांची बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष पदासंदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जात असतानाच दानवे यांनी ही बैठक का बोलवण्यात आली होती, त्याबद्दल खुलासा केला आहे.
रावसाहेब दानवे यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भाजप नेत्यांची बैठक पार पडली. दानवे म्हणाले की, “केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नवीन मंत्र्यांचा समावेश झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते दिल्लीत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरच चंद्रकांत पाटीलही शनिवारपासून दिल्लीत आहेत.
रविवारी पाटील त्यांनी उद्योगमंत्री नारायण राणे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चेला उत्तर दिले. आमच्या पक्षात तशी चर्चा नाही. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. काँग्रेसला वर्षभरापासून पक्षाध्यक्ष मिळत नाही. भाजपाचा प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याच्या या निव्वळ चर्चा असून त्यात काही तथ्य नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं.
दानवे पुढे म्हणाले, सर्व मंत्र्यांची भेट घेऊन त्यांना पुढील कामासाठी शुभेच्छा द्यायच्या होत्या. इतर खासदारांनाही बैठकीचं आमंत्रण होतं. एकत्र बसून जेवण्याच्या हेतूने आम्ही सर्व भेटलो होतो. या ठिकाणी कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
BJP to change state president of Maharashtra? See what Raosaheb Danve said
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App