UNSC open debate; चीन-अमेरिका भिडले; दक्षिण चीन समुद्रात १३ दशलक्ष चौरस मैल प्रदेशावर चीनचा बेकायदा दावा; चीन exposed…!!

वृत्तसंस्था

संयुक्त राष्ट्र संघ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या खास बैठकीत चीन आणि अमेरिका एकमेकांना भिडले. अनेक मुद्द्यांवर एकमेकांना यांनी खडे बोल सुनावले. मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेसंदर्भात open debate मध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या बरोबरच अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अंँथनी ब्लिंकेन सहभागी झाले होते. त्यांनी परखड शब्दांमध्ये सागरी सुरक्षेसंदर्भात चीनचा सर्व देशांना कसा धोका आहे. चीन दक्षिण चीन समुद्रात कशा बेकायदेशीर नाविक कारवाया करत आहे, याचे सविस्तर वर्णन केले. त्याला संयुक्त राष्ट्र संघातले चीनचे कायमचे उप प्रतिनिधी डाइ बिंग बिंग यांनी प्रत्युत्तर दिले.China exposed in UNSC open debate chaired by PM narendra modi

एक प्रकारे open debate चा हेतू यातून साध्य झाला. दक्षिण चीन समुद्रात 13 दशलक्ष चौरस मैल प्रदेशावर चीन आपला दावा सांगतो आहे. अनेक ठिकाणी त्यांनी कृत्रिम बेटांवर लष्करी नाविक तळ उभारले आहेत. त्याचा धोका ब्रुनेई, तैवान, व्हिएतनाम, मलेशिया, फिलिपीन्स यांच्यासह आग्नेय आशियातील देशांना उत्पन्न होतो आहे. आशिया – प्रशांत महासागरातून Indo – Pacific प्रवास करणाऱ्या व्यापारी जहाजांना चिनी नाविक दलाचा धोका वाटतो. अनेक देशांच्या नाविक दलांशी चिनी नाविक दलाचे संघर्ष उद्भवले आहेत. आग्नेय आशियातील देश छोटे आहेत. त्यांचे सामर्थ्य मर्यादित आहे. याचा गैरफायदा चीन घेतो आहे, असा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री अँथनी ब्लिंकेन यांनी केला.



त्यावरून चीनचे प्रतिनिधी भडकले. अमेरिका आंतरराष्ट्रीय नाविक नियम मूळात पाळत नाही. संयुक्त राष्ट्रसंघाच्या नाविक समितीच्या कक्षेबाहेर राहून इतरांना तो देश उपदेश करतो. दक्षिण चीन समुद्र हा open debate चा विषय नसताना त्या देशाने हा विषय उकरून काढला आहे. आग्नेय आशियातील देश आणि चीन हे एकमेकांशी चर्चा करून आपल्या संबंधांबाबत निर्णय घेतील. त्यात अमेरिकेने लक्ष घालण्याची गरज नाही, असे चिनी प्रतिनिधींनी ऐकवले.

परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन कशी दादागिरी करतो आहे, हे या निमित्ताने उघड झाले. आग्नेय आशियातील 11 देश छोटे आहेत. त्यांची अर्थव्यवस्था समुद्रातील कार्यवाही आणि सामग्रीवर अवलंबून आहे. अशा स्थितीत चीनचे तिथे वर्चस्व वाढणे या देशांना कायम धोकादायक वाटते. समुद्रात सतत संघर्षशील वातावरण राहते. open debate च्या निमित्ताने ही बाब संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीच्या फोरमवर आली. त्यामुळे चीनचा तिळपापड झाला. चीनला इतर सर्व देशांत बरोबर आपल्या terms and conditions वर संबंध ठेवायचे आहेत. आंतरराष्ट्रीय नियमावली धाब्यावर बसवायची आहे, असा अमेरिकेचा आरोप आहे. तर, आंतरराष्ट्रीय नियमावली अमेरिकेसारख्या देशांच्या दबावाखाली तयार करण्यात आली आहे, असा चीनचा आरोप आहे.

या सगळ्यात भारतासह आग्नेय आशियातील छोटे 11 देश, ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड श्रीलंका या संपूर्ण मोठ्या सामुद्रिक टापून धोका उत्पन्न झाला आहे. दक्षिण चीन समुद्रातून शस्त्रास्त्रे यांची तस्करी चिनी नाविक दलाच्या छुप्या पाठिंब्याने चालते, याकडे अँथनी ब्लिंकेन यांच्याबरोबरच अन्य सुरक्षा समितीच्या सदस्य देशांनी ही लक्ष वेधले. अंतिमतः ही तस्करी छोट्या देशांच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका उत्पन्न करते. यातून चीनचे वर्चस्ववादी धोरण संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीत उघड पडल्याने चीनचा तिळपापड झाला.

चिनी प्रतिनिधींचा अमेरिकेवर फक्त perception level वर दादागिरी करण्याचा आरोप होता. परंतु दक्षिण चीन समुद्र आणि आशिया प्रशांत महासागरात चीनची जी प्रत्यक्ष दादागिरी चालू आहे, प्रत्येक देशाच्या नाविक दलाशी चिनी नाविक दलाचा जो संघर्ष उडतो आहे हे या open debate च्या निमित्ताने प्रथमच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या फोरमवर उघड्यावर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा समितीच्या या open debate चे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल अँथनी ब्लिंकेन यांनी त्यांचे अभिनंदन केले. आंतरराष्ट्रीय सागरी सुरक्षेसंदर्भात सर्व देशांना एका फोरमवर आणून खुली चर्चा करण्याची संधी पंतप्रधान
मोदी यांनी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो, असे ब्लिंकेन म्हणाले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा समितीचे अस्थायी अध्यक्षपद हे फक्त महिनाभरासाठी भारताकडे असले, तरी त्याचा भारताने यानिमित्ताने व्यूहरचनात्मक पातळीवर कसा उपयोग करून घेतला आणि आपल्या राष्ट्रीय सुरक्षेला वाटणाऱ्या धोका त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात वाटणारी चिंता याविषयीचा practical approach सर्व सदस्यांना मांडण्याची संधी कशी दिली हे दिसून आले. एक प्रकारे चीनला खुलेपणाने exposed करण्याची भारताने साधलेली ही संधी आहे, असे अंतरराष्ट्रीय मुत्सद्दी वर्तुळात बोलले जात आहे.

China exposed in UNSC open debate chaired by PM narendra modi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात