विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात महायुतीची सत्ता स्थापन होण्यापूर्वी राज्यभरात जे सगळे मंथन चालले आहे, ते विसरायला लावणारा शपथविधीचा दणकेबाज सोहळा करण्याचे भाजप नेतृत्वाचे घाटत असून शपथविधीच्या सोहळ्याच्या निमित्ताने साधुसंत + वारकरी + लाडक्या बहिणी आणि शेतकऱ्यांचा हिंदू एकजुटीचा नारा पुन्हा घुमवायचा इरादा भाजपने व्यक्त केला आहे.
महायुतीत सरकार स्थापन होण्यापूर्वी आठवडाभर जोरदार मंथन झाले, काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आजारपण झाले, ते सगळे विसरून महायुतीची एकजूट दिसेल, इतकेच नव्हे, तर ज्या हिंदू एकजुटीमुळे महायुतीचा विजय झाला, ती एकजूट पुन्हा सगळ्या देशासमोर डंका वाजवेल, अशा पद्धतीने शपथविधी सोहळ्याची रचना भाजपने आखली आहे.
Eknath Shinde : आपटवीरांची मांदियाळी, शिंदेंच्या पाठीशी उभी राहिली!!
मुंबईतील आझाद मैदानावर होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपचे सगळे वरिष्ठ नेते 22 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेतच, पण त्याचबरोबर विविध धर्मपंथांचे साधुसंत, वारकरी संप्रदायातील आचार्य, लाडक्या बहिणी, मुंबईतले डबेवाले, कामगार, व्यावसायिक आणि शेतकरी या सर्व वर्गांच्या प्रतिनिधींना भाजपने शपथविधी सोहळ्यासाठी आवर्जून निमंत्रित केले आहे. यातून भाजप महायुती एकत्र आणि महाराष्ट्रात सर्वत्र हा संदेश देण्याचा इरादा भाजप नेत्यांचा दिसतो आहे.
सर्वधर्मीय पंथीयांचे साधुसंत आणि वारकरी संप्रदायाचे आचार्य यांनी हिंदू समाजाला आवर्जून मतदान करण्याचे आवाहन केले होते. सजग रहो आंदोलनात या सगळ्यांनी हिरीरीने भाग घेतला होता. त्याचा परिणाम म्हणून मतदान वाढले. याची शपथविधी सोहळ्यामध्ये भाजपने सन्मानपूर्वक दखल घेतली आहे.
बाकी शासकीय प्रोटोकॉल नुसार माजी मुख्यमंत्री म्हणून शरद पवार, उद्धव ठाकरे या नेत्यांना निमंत्रण गेले आहे, पण ते उपस्थित राहणार किंवा नाही त्या संदर्भात अजून काही समजलेले नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App