वृत्तसंस्था
मुंबई : जालनास्थित पोलाद निर्मिती समूहावर प्राप्तिकर विभागाने छापे टाकून ३०० कोटींची बेहिशेबी मालमत्ता उघड केली आहे.चार मोठ्या कारखान्यांच्या हा उद्योग समूह आहे, तसेच या कंपन्यांचे ७१ कोटींचे अधिक उत्पन्न असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. Big action of income tax department! Raids on steel companies reveal unaccounted assets worth Rs 300 crore
स्टीलचे टीएमटी बार्स आणि बिलेटस् म्हणजेच छर्रे निर्मिती कंपन्यांच्या जालना, औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि कोलकता येथे छापे टाकले होते. तेव्हा कंपन्या मोठ्या प्रमाणात बेहिशेबी आर्थिक व्यवहारात गुंतल्याचे स्पष्ट झाले.
अनेक व्यवहारांची अधिकृत कागदपत्रांवर नोंद नाही. पुराव्यांनुसार या कंपन्यांनी बनावट कंपन्या आणि शेअर प्रीमियमच्या माध्यमातून मोठ्या बेहिशेबी रकमेचा गैरव्यवहारही केला आहे. २०० कोटींची अतिरिक्त खरेदी लक्षात आली असून, बेहिशेबी मोठा मालही सापडला आहे. आतापर्यंतच्या छाननीतून ३०० कोटींहून अधिक मूल्याची बेहिशेबी मालमत्ता समोर आली असून, चार कंपन्यांचे ७१ कोटींचे अतिरिक्त उत्पन्न समोर आले आहे.
आयकर विभागाने एकाचवेळी केलेल्या उद्योग समूहावरील छाप्यातून १२ बँक लॉकर उघडकीस आले आहेत, तसेच २.१० कोटी बेहिशेबी रोख आणि १.०७ कोटींचे दागिने अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App