मार्च 2020 मध्ये देशात कोविड-19 या चिनी विषाणूमुळे आलेली महामारी पसरण्यास सुरुवात झाली. पण गुड न्यूज अशी आहे की गेल्या सहा महिन्यात पहिल्यांदाच देशातल्या कोविड रुग्णांची संख्या वीस हजारांपेक्षा कमी झाली आहे. केंद्र सरकारने जगात सर्वोत्तम अशा पद्धतीने राबवलेल्या लसीकरण मोहिमेचे हे यश मानले जात आहे. मात्र अजूनही केरळमुळे देशापुढचे आव्हान कायम आहे. Covid-19 patients in India below 20,000 for the first time after six months. Thanks to the best vaccination drive in the world by the Indian Government. But still Kerala causing problems.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : तब्बल 130 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येचा देश भारत. एखाद्या उपखंडासारखा आकाराने प्रचंड मोठा. त्यातही पुन्हा हिमालयाच्या सर्वोच्च शिखरांपासून ते थरच्या वाळवंटांपर्यंत आणि ईशान्येच्या पर्वतांपासून दक्षिणेच्या सागरी किनाऱ्यापर्यंतची कमालीची भौगौलिक विविधता. जात, धर्म, भाषा आदी फरकामुळे एकसंध नसलेला भारत. अशा देशात कोरोना विषाणूविरुद्ध महत्त्वाचे अस्त्र असणारे लसीकरण मोहिम कशी गती घेणार, अशी शंका पाश्चिमात्य देशांनी उपस्थित केली होती. यातूनच जागतिक महामारीविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय लढ्यामध्ये भारत हा अडथळा ठरू शकतो असाही अपप्रचार भारताच्या काही हितशत्रूंनी जाणीवपूर्वक केला. मात्र या सगळ्यांना खोटे ठरवत भारताने अभूतपूर्व वेगाने देशाच्या कानाकोपऱ्यात लसीकरण पोहोचवले.
त्याचाच परिणाम म्हणून तब्बल 201 दिवसांनी म्हणजेच सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीनंतर संपूर्ण देशातील कोरोना रुग्णांची संख्या वीस हजारांच्याही खाली आली आहे. गेल्या चोवीस तासात देशात फक्त 18 हजार 795 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्याचबरोबर देशातल्या सक्रीय रुग्णांची संख्याही आता तीन लाखांच्या खाली आली आहे. गेल्या सहा महिन्यात पहिल्यांदाच हे शक्य झाले आहे. यामुळे कोरोना महामारीच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता दुरापास्त होत चालली आहे.
केरळ आणि महाराष्ट्र या दोन राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांमुळे देशाचे चित्र बदलत होते. मात्र या दोन राज्यांमध्येही आता परिस्थिती सुधारू लागली आहे. केरळात गेल्या दहा दिवसांमध्ये वीस हजारांपेक्षा कमी कोरोना रुग्ण नोंदले गेले. गेल्या दोन आठवड्यांमध्ये केरळातील सक्रीय रुग्णांची संख्यादेखील दोन लाखांवरुन कमी होऊन 1.63 लाखांवर आली आहे. मात्र अजूनही देशातल्या एकूण सक्रीय कोरोना रुग्णांमध्ये केरळचा वाटा 55 टक्के इतके सर्वाधिक आहे.
सोमवारी भारताने नव्या कोविड रुग्णांची सर्वात कमी संख्या नोंदवली. गेल्या दोनशे दिवसात प्रथमच नव्या कोविड रुग्णांची संख्या 19 हजार 860 इतकी नोंदवली गेली. यापूर्वी म्हणजेच 202 दिवसांपूर्वी 9 मार्च 2021 रोजी यापेक्षा कमी कोविड रुग्ण संख्या नोंदली गेली होती. कोरोना बळींची संख्याही 178 एवढी कमी झाली आहे. हा आकडा देखील 22 मार्च 2021 नंतरचा नीचांकी आहे. दरम्यान केरळात गेल्या पाच आठवड्यांमध्ये 11 हजार 699 नवे रुग्ण आढळले.
दरम्यान, संपूर्ण देशातून कोरोनाची साथ हटू लागल्याचे दिसत आहे. अपवाद फक्त केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि मिझोराम या राज्यांचा आहे. या पाच राज्यांमध्ये अजूनही दररोज सरासरी एक हजार नवे कोरोना रुग्ण आढळत आहेत. दुसऱ्या बाजूला बिहार, राजस्थान आणि झारखंड तसेच अंदमान-निकोबार बेटे, दादरा-नगर-हवेली, दमण-दिव आणि चंदीगड या केंद्रशासीत प्रदेशांमध्येही दररोजच्या कोरोना रुग्णांची संख्या शंभरपेक्षा कमी झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App