ठाकरे गटाला धक्का! सुभाष देसाईंच्या मुलाचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश

Shinde eknath

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.

प्रतिनिधी

मुंबई : उद्धव ठाकरे गटाला आज आणखी एक धक्क बसला आहे. ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री उद्योगमंत्री सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. Bhushan Desai son of former industries minister and Uddhav Thackeray faction leader Subhash Desai joins CM Eknath Shinde’s Shiv Sena.

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पाडल्यानंतर. शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाला लागलेली गळती अद्याही थांबलेली नाही. आता उद्धव ठाकरे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जाणारे  माजी उद्योगमंत्री आणि ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. हा ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.


शीतल म्हात्रेंच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाची ‘SIT’ कडून चौकशी होणार!


भूषण देसाईंनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना सांगितले की, “बाळासाहेब ठाकरे हेच माझे दैवत आहेत. बाळासाहेब आणि शिवसेना या दोन शब्दांना सोडून तिसरा शब्द माझ्यासमोर आलेला मला आठवत नाही. हिंदुत्वाचा विचार आणि बाळासाहेबांनी महाराष्ट्रासाठी पाहिलेलं स्वप्न हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेऊन जात आहेत. ते वाढवत आहेत. यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे. आम्ही आधीपासून एकमेकांबरोबर काम केलं आहे. मी एकनाथ शिंदे यांना जवळून काम करताना बघितलं आहे. त्यांच्या कामाचा वेग आणि त्यांची निर्णयक्षमता पाहून मी त्यांच्या पाठिशी उभं राहण्याचा निर्णय घेतला.”

महत्वाच्या बातम्या 

Bhushan Desai son of former industries minister and Uddhav Thackeray faction leader Subhash Desai joins CM Eknath Shindes Shiv Sena.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात