बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी बसून गायले राष्ट्रगीत, मुंबईत एफआयआर दाखल


पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नव्या वादात सापडल्या आहेत. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ममता बॅनर्जी यांनी सभागृहात बसून राष्ट्रगीत गायले, त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने ममता बॅनर्जी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. ममता बॅनर्जींनी राष्ट्रगीताचा अवमान केला आणि खाली बसून राष्ट्रगीत गायल्या, असा आरोप भाजप नेत्याने केला आहे, एवढेच नाही तर त्यांनी फक्त बसूनच राष्ट्रगीत गायले नाही तर चार-पाच ओळीच गाऊन एकदम थांबवले. Bengal CM Mamta Banerjee sat during national anthem, FIR lodged in Mumbai


वृत्तसंस्था

मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नव्या वादात सापडल्या आहेत. मुंबईत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ममता बॅनर्जी यांनी सभागृहात बसून राष्ट्रगीत गायले, त्यामुळे त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने ममता बॅनर्जी यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे. ममता बॅनर्जींनी राष्ट्रगीताचा अवमान केला आणि खाली बसून राष्ट्रगीत गायल्या, असा आरोप भाजप नेत्याने केला आहे, एवढेच नाही तर त्यांनी फक्त बसूनच राष्ट्रगीत गायले नाही तर चार-पाच ओळीच गाऊन एकदम थांबवले.

बुधवारी ममता बॅनर्जी मुंबईत होत्या आणि त्यादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि केंद्रातील विरोधी पक्षांना भाजपविरोधात एकत्र करण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर ममता बॅनर्जी यांनी मुंबईत पत्रकार परिषदही घेतली आणि त्यादरम्यान त्यांनी राष्ट्रगीत गायले आणि मध्येच राष्ट्रगीत संपवून जय महाराष्ट्राचा नारा दिला. पश्चिम बंगाल भाजप युनिटच्या नेत्याने इंटरनेटवर 16 सेकंदांचा एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी आरोप केला आहे की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या संस्कृतीचा अपमान केला आहे, राष्ट्रगीत आणि देशाचा अपमान केला आहे, गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा अपमान केला आहे.

भाजप नेत्याच्या या ट्विटनंतर भाजपच्या इतर नेत्यांनीही ममता बॅनर्जींवर टीका केली. भाजप नेते अमित मालवीय यांनी ट्विट करून लिहिले, राष्ट्रगीत हे आपल्या राष्ट्रीय अस्मितेची सशक्त अभिव्यक्ती आहे. सार्वजनिक पदावर असलेल्या लोकांकडून ही अपेक्षा नव्हती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी जे गायले आहे ते राष्ट्रगीताचे विकृत रूप आहे. भारतातील विरोध पक्ष एवढे गर्विष्ठ आणि देशभक्ती नसलेला आहेत का? असा सवालही त्यांनी केला आहे.

Bengal CM Mamta Banerjee sat during national anthem, FIR lodged in Mumbai

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात