वृत्तसंस्था
पुणे : शहर आणि परिसराला लॉकडाऊन उठण्याचे वेध लागले आहेत. दुसरीकडे बार, बिअर शॉप मालकांना आता धीर धरवेना झाला आहे. त्याचेच एक उदाहरण समोर आले आहे. हिंजवडीत 18 बार, बिअर शॉप सुरु ठेवल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. Beer shop bar sealed in Hinjawadi Pune
नियमांचे सर्रासपणे उल्लंघन करुन पुण्यातील हिंजवडी आयटी पार्क परिसरात हॉटेल्स, बार, बिअर शॉप सुरू असल्याची माहिती पुणे पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून हिंजवडी परिसरातील हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, बिअर शॉप्स अशा एकूण 18 ठिकाणी कारवाई केली आहे.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत कठोर निर्बंध 1 जूनपर्यंत लागू आहेत. मात्र, हिंजवडी परिसरात नियमांचे उल्लंघन करून सुरु ठेवलेल्या हॉटेल्स, बिअर शॉप्स, बारवर कारवाई केली आहे. या धडक कारवाईमुळे बार, हॉटेल, बिअर शॉप चालक वठणीवर आले आहेत. अर्थात कारवाई पूर्वी त्यांनी गल्ला मात्र भरून घेतला असावा, अशी चर्चा सुरु आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App