गुजरातमधील अहमदाबादमध्ये महानगरपालिकेकडून रस्त्यांवर मांसाहारी खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.Beef ban was a trailer in this country with 80% non-vegetarians – Jitendra Awhad
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काही वर्षांपूर्वी मुंबईत काही सोसायट्यांमध्ये मांसाहारी जेवणावर आणि मांसाहार करणाऱ्यांवर बंदी घालण्यात आली होती. त्यावरून बरंच राजकारण तापल्याच्या चर्चा आजही अधून-मधून होत असतात. दरम्यान आता पुन्हा एकदा व्हेज-नॉनव्हेज हा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. या वादाच्या केंद्रस्थानी आता भाजपा सरकार असणार आहे.
गुजरातमधील अहमदाबादमध्ये महानगरपालिकेकडून रस्त्यांवर मांसाहारी खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांना बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामध्ये शाळा,महाविद्यालये आणि धार्मिक स्थळांपासून १०० मीटर अंतरामध्ये मांसाहारी पदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉलवर गुजरात सरकारने कारवाई करण्यात आली आहे. तसेच, मांसाहार पदार्थ विणा-यांना स्टॉल विक्रेत्यांना मनाई करण्यात आली आहे. यामुळे स्टॉल मालकांच्या अडचणीत वाढ झाली.
याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत गुजरात सरकारवर टीका केली आहे.आव्हाड म्हणाले की ‘अहमदाबादमध्ये रस्त्यावर मांसाहारी खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान ८० टक्के मांसाहारी लोक असलेल्या या देशात बीफबंदी हा ट्रेलर होता. पुढे काय घडणार याचा इशारा देणारा चित्रपट गुजरातमध्ये सुरू झाला आहे. तुम्ही काय खावे, हेसुद्धा आता शासन ठरवणार’, असं आव्हाड म्हणालं.
अहमदाबादमध्ये रस्त्यावर मांसाहारी खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांना मज्जाव करण्यात आला आहे. ८०% मांसाहारी लोक असलेल्या या देशात बीफबंदी हा ट्रेलर होता. पुढे काय घडणार याचा इशारा देणारा चित्रपट गुजरातमध्ये सुरू झाला आहे.तुम्ही काय खावे हे सुद्धा आता शासन ठरवणार #gujrat_govt — Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 17, 2021
अहमदाबादमध्ये रस्त्यावर मांसाहारी खाद्यपदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांना मज्जाव करण्यात आला आहे.
८०% मांसाहारी लोक असलेल्या या देशात बीफबंदी हा ट्रेलर होता. पुढे काय घडणार याचा इशारा देणारा चित्रपट गुजरातमध्ये सुरू झाला आहे.तुम्ही काय खावे हे सुद्धा आता शासन ठरवणार #gujrat_govt
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) November 17, 2021
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App