मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती देणे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी पुरवणे आदी गोष्टी होऊ शकलेल्या नाहीत, असेही ते म्हणाले.Beed: Farmers’ issues are not resolved immediately; After Diwali, farmers will form a morcha in the district – MLA Vinayak Mete
विशेष प्रतिनिधी
पुणे : शेतकऱ्यांच्या आत्महत्या दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत . दरम्यान बीड जिल्ह्यात गेल्या १० महिन्यांमध्ये दोनशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.परंतु राज्य सरकारमधील एकाही मंत्र्याला त्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही.
बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामेदेखील गांभीर्याने करत नाहीयेत. त्यामुळे केवळ चार ते पाच हजारांची मदत शेतकऱ्यांना दिली जात आहे.त्यामुळे मेटे म्हणले की,जर शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीने सुटले नाहीत तर दिवाळीनंतर लगेचच बीड जिल्ह्यात शेतकरी मोर्चा काढण्यात येईल.
सरकारला फक्त आर्यन खानला वाचविण्यात त्यांना रस आहे, अशी टीका आमदार विनायक मेटे यांनी पत्रकार परिषदेत केली.मराठा आरक्षणाच्या बाबतीत वेळोवेळी शब्द देऊनही सरकार चालढकल करत आहे.
मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती देणे, अण्णासाहेब पाटील महामंडळाला निधी पुरवणे आदी गोष्टी होऊ शकलेल्या नाहीत, असेही ते म्हणाले.यावेळी शिवसंग्रामचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, प्रदेश प्रवक्ता तुषार काकडे, शहराध्यक्ष भरत लगड, बाळासाहेब चव्हाण उपस्थित होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App