G20 MEET : पंतप्रधान मोदींची रोमच्या प्रसिद्ध ट्रेवी फाऊंटनला भेट


वृत्तसंस्था

नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या इटलीची राजधानी रोममध्ये होणार्‍या जी-20 शिखर परिषदेसाठी आले आहेत. परिषदेच्या दुसर्‍या दिवशी रविवारी मोदींनी येथील प्रसिद्ध ट्रेवी फाऊंटनला भेट दिली आणिआपल्या समकक्ष नेत्यांशी चर्चाही केलीPrime Minister Modi visits the famous Trevi Fountain in Rome

पाच दिवसांच्या विदेश दौर्‍यावर आलेले पंतप्रधान मोदी आपल्या प्रवासातील पहिल्या टप्प्यात म्हणजे इटलीत आहेत. रविवारी त्यांनी अन्य वैश्विक नेत्यांसह रोममधील प्रसिद्ध ट्रेवी फाऊंटनला भेट दिली. हे इटलीतील सर्वाधिक प्रेक्षणीय स्मारकांपैकी एक आहे. बरोक कला शैलीतील या स्मारकाला अनेक चित्रपटांतून प्रेमाचे प्रतीक म्हणून दाखविले जाते. येथे नाणे टाकण्याची परंपरा प्रसिद्ध आहे. जर तुम्ही या फाऊंटेनच्या पाण्यात नाणे टाकल्यास, तुम्ही निश्चितपणे पुन्हा रोममध्ये याल, असे ंमानले जाते. मोदींनीही अन्य जागतिक नेत्यांसह नाणे या फाऊंटनमध्ये टाकले.

दरम्यान, या भेटीनंतर मोदींनी स्पेनच्या पंतप्रधानांची भेट घेतली.

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सँशेज यांच्याशी त्यांची द्विपक्षीय चर्चा झाली. दोन्ही नेत्यांनी परस्पर संबंध मजबूत करण्यावर जोर दिला आणि परस्पर सहकार्य वाढविण्याविषयी प्रतिबद्धता व्यक्त केली.

Prime Minister Modi visits the famous Trevi Fountain in Rome

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात