विशेष प्रतिनिधी
नागपूर : महाराष्ट्रातील 193 बसस्थानकांचे सौंदर्यीकरण आणि सुशोभिकरण करण्यात येणार असून आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्यात ६०० कोटी रुपयांचा सामंजस्य करार करण्यात आला. Beautification of 193 ST bus stations in Maharashtra 600 crore deal
एसटी बसस्थानकांचा कायापालट करण्यात एमआयडीसीने योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले होते, या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हा सामंजस्य करार करण्यात आला. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गत हे सुशोभिकरण करण्यात येणार आहे.
कर्जत जामखेड एमआयडीसी साठी पावसात भिजण्याची नौटंकी; आमदार राम शिंदे सुनावली खरी खोटी!!
या सामंजस्य करारानुसार पहिल्या टप्प्यात एमआयडीसीकडून 193 एसटी बसस्थानकातील कॉक्रिटीकरणासाठी 500 कोटी रुपये, रंगरंगोटी ,किरकोळ दुरुस्ती करण्याची 100 कोटी रुपये खर्चाची निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यातून या बसस्थानकांचा कायापालट होणार आहे.
नागपूर येथील विधानभवनात आयोजित कार्यक्रमास उद्योग मंत्री तथा एमआयडीसीचे अध्यक्ष उदय सामंत, परिवहन विभागाचे प्रधान सचिव पराग जैन-नैनोटीया, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App