प्रतिनिधी
पुणे : पुण्यातील पुरंदरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रस्ताव गुंडाळून अदानी ग्रुप ला बारामतीत खासगी विमानतळ बांधण्याची परवानगी दिली असल्याची बातमी येताच त्यावर पुणे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. शरद पवारांनी घेतलेल्या गाठीभेटी गौतम अदानी यांचे केलेले कौतुक आणि त्यानंतर बारामतीत विमानतळ होणार याची आलेली बातमी यावरूनच राष्ट्रवादीमध्ये देखील अस्वस्थता आहे. ही अस्वस्थता खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी बोलून दाखवल्या नंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना कानपिचक्या दिल्या आहेत Baramati – Don’t do Baramati, is it a toy airport?
आमदार दिलीप मोहितेंनी आपल्या भाषणात चाकण, खेड परिसरात विमानतळ झाले असत तर चाकण एमआयडीसी मध्ये आलिशान हॉटल्स असते, पण, ते विमानतळ आता बारामतीला गेले, किमान आम्हाला डोमॅस्टिक विमानतळ द्यावे अशी विनंती त्यांनी अजित पवार यांना केली. हाच धागा पकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विमानतळ हे काय खेळण्यातील नाही की अजून एक द्या अस म्हणायला, त्याचा सर्व्हे करायला लागतो, उगाच बारामती, बारामती करू नका. विमानतळ बारामतीला नेले जाणार नाही, अस अजित पवार यांनी स्पष्ट केले. ते चाकण येथे खासगी हॉटेल्सच्या उदघाटना प्रसंगी आले होते.
राष्ट्रवादी पक्षाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात खेड तालुक्यात न झालेल्या विमानतळाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, आपल्याकडील काही नेत्यांनी विरोध करायला नको होता. विमानतळ झाले असत तर चेहरा मोहरा बदलला असता. आता ते विमानतळ बारामतीला करायचे ठरवले आहे. इकडे विमानतळ झाले असते तर आणखी विकास झाला असता, अनेकांनी हॉटेल्ससाठी जागा घेतल्या होत्या. हॉटेलचे नामांकित ग्रुप या परिसरात आले असते. अजित पवार यांना विनंती आहे की, आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बारामतीला नेले त्याचा आनंद आहे. पण निदान डोमॅस्टिक विमानतळ खेडला द्या. याबाबत अजित पवार यांनी मला शब्द दिलाय आणि ते पाळतात हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, असे मोहिते म्हणाले.
तोच धागा पकडून अजित पवार यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, विमानतळ बारामतीला नेले जाणार नाही. कारण नसताना उगाच बारामती, बारामती करू नका. एअरपोर्ट च्या बाबतीत हवाई उड्डाण सर्व्हे करत, संरक्षण विभाग मान्यता देत. कारण तिथे लष्कराच्या विमानांना सराव करायचा असतो. दोन- दोन विमानतळ देता येत नाही, एक विमानतळ होता- होता नाकी नऊ आलेत, किती वर्षे झाले हा विषय सुरू आहे. हे काय खेळण्यातील विमानतळ आहे का? की अजून एक विमानतळ द्या. अस होत नाही, कृपया गैरसमज घेऊन करू नका.
पुढे ते म्हणाले की, पिंपरी-चिंचवड, पुणे हे दोन्ही शहर जगाच्या नकाशा एकच आहेत म्हणून ओळखले जातात. उद्योपतींना स्वतःचे प्लेन घेऊन उतरता आले पाहिजे, दिवसभर काम करून त्याला जाता आले पाहिजे, अशी व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी करायचे ठरवले आहे. त्याकडे माझे बारकाईने लक्ष आहे, असे अजित पवार म्हणाले.
अजित पवार यांनी दिलीप मोहिते यांना जरी कानपिचक्या दिल्या असल्या तरी त्यांचा रोख नेमका कोणाकडे होता?, यावर राष्ट्रवादीच्या अंतर्गत वर्तुळात चर्चा सुरू आहे.
मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेनचा सर्व्हे
अजित पवार म्हणाले की, मुंबई ते हैद्राबाद बुलेट ट्रेन चा सर्व्हे सुरू आहे. ती मुंबई, नवी मुंबई, मावळ, बारामती, पुरंदर, हवेली, खेड, पंढरपूर, सोलापूर, इंदापूर, इथून जाणार आहे. त्यात फार कमी स्थानक असलेली बुलेट ट्रेनची आखणी केंद्र सरकार करत आहे, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App