काश्मिरी पंडित राहुल भटच्या हत्येचा भारतीय जवानांकडून 24 तासात बदला; 3 दहशतवादी ठार!!


वृत्तसंस्था

श्रीनगर : काश्मिरी पंडित राहुल भट यांची हत्या केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद देशभरात उमटले. या हत्येनंतर राहुल भट यांच्या पत्नीने त्यांच्या पतीचे प्राण धोक्यात असताना त्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा असा आरोप केला होता. पण त्यानंतर पुढच्या २४ तासांतच भारतीय लष्कराच्या जवानांनी राहुल भट यांची हत्या करणाऱ्या 2 दहशतवाद्यांना ठार मारून बदला घेतला. Revenge of killing of Kashmiri Pandit Rahul Bhatt by Indian soldiers within 24 hours

भारतीय लष्कराच्या जवानांनी बांदीपोरामध्ये 3 दहशतवाद्यांना ठार केले. या पैकी 2 दहशतवादी राहुल भटच्या हत्येत सामील होते. फैजल उर्फ सिकंदर आणि अबू कसा कुकसा या दोन दहशतवाद्यांची नावे होती. तिसरा दहशतवादी गुलजार अहमद होता.


Jammu Kashmir Elections : जम्मू-काश्मिरात कधी होणार निवडणुका? केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत दिले उत्तर, वाचा सविस्तर…


या तिघांनाही भारतीय लष्कराच्या जवानांनी चकमकीत ठार केले आहे. फैजल उर्फ सिकंदर हा याआधी 3 पोलिसांच्या हत्येत सामील होता. या हत्या करून तो पाकिस्तानात पळून गेला होता. परंतु काही दिवसांपूर्वी तो बडगामला आला होता आणि त्याने अबू उकसा सह महसूल कार्यालयात जाऊन राहुल भट यांची हत्या केली होती.

राहुल भट हे बडगाम जिल्ह्यातील चदूरा तहसीलदार कार्यालयामध्ये महसूल अधिकारी म्हणून कार्यरत होते. राहुल भट यांची पत्नी मीनाक्षी हिने तिचे पतीशी १० मिनिटांपूर्वीच बोलणे झाले होते. लवकर या वाढदिवसाला जाऊ असे ती म्हणाली होती. त्यावर राहूल यांनी ठीक आहे असे म्हटले होते.

त्यानंतर दहा 10 मिनिटातच फैजल उर्फ सिकंदर आणि अबू उकसा हे दोघे दहशतवादी कार्यालयात घुसले आणि त्यांनी राहुल भट यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती. नंतर हे दोघेही जंगलात पळून गेले होते तेथून ते बांदीपोऱ्यायाला गेले आणि लष्कराशी झालेल्या चकमकीत ठार झाले. लष्कर त्यांचा ट्रॅक ठेवून होते.

Revenge of killing of Kashmiri Pandit Rahul Bhatt by Indian soldiers within 24 hours

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात