Nitesh Rane : समुद्री किनारी वसणाऱ्या बांगलादेशींचा बंदोबस्त करणार, नितेश राणेंचा इशारा

Nitesh Rane

विशेष प्रतिनिधी

मुंबई: Nitesh Rane सागरी सुरक्षा अत्यंत महत्वाची आहे. २६/११ नंतर आपण बरीच खबरदारी घेतली. समुद्री किनाऱ्यावर वसणाऱ्या बांगलादेशींचीही बंदोबस्त करणार, असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे.Nitesh Rane

मत्स्य आणि बंदर खात्याची जबाबदारी मंत्री नीतेश राणे यांनी मंगळवारी आपल्या पदभार स्वीकारला. या दरम्यान माध्यमांशी संवाद साधताना मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी मत्स्य व बंदरे विभागातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला. मत्स्य आणि बंदर खात्यातीतील विविध प्रश्नांवर चर्चा केली.समुद्र किनारी रोहिंग्यो आणि बांगलादेशी यांचे वास्तव्य सहन करणार नाही, असेही ते म्हणाले.



मत्स्य आणि बंदरे दोन्ही खात्यांमध्ये काय सुरू आहे? आपण कुठून सुरुवात करायची? याचा मी आढावा घेतल्याचे नीतेश राणे यांनी सांगितले. माझ्या काही अपेक्षा किंवा विकासाच्या अनुषंगाने बदल करण्यासाठी काय करता येईल, यासाठी काही सूचना दिल्या, असेही नीतेश राणे यांनी सांगितले.

 

नितेश राणे यांनी रोहींग्यो आणि बांगलादेशींना इशारा दिला. सागरी सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे. २६/११ च्या हल्ल्यानंतर आपण बरीच खबरदारी घेतली. मात्र आताही काही जिहादी लोकांच्या अॅक्टिव्हिटी सागरी किनाऱ्यावर काम करत असतात, असा दावा नीतेश राणे यांनी केला. त्यामुळे त्यासाठी काय करता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नितेश राणे म्हणाले. रोहिंग्यो आणि बांगलादेशी यांचे वास्तव्य सहन करणार नाही, त्यांना सोडणार नाही. त्यांची सफाई मोहीम हाती घेऊ. समुद्री किनाऱ्यावर वसणाऱ्या बांगलादेशींचीही बंदोबस्त करणार, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला.

Bangladeshis living on the sea coast will be scrutinized, Nitesh Rane’s warning

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात