जनतेचे प्रश्न काय…?? आणि नेते भांडत आहेत कशावरून…??; बाबा आढाव यांनी प्रसिद्धी माध्यमांनाही फटकारले

प्रतिनिधी

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातला वाद मिनिटागणिक वाढत असताना ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा आढाव यांनी दोन्ही पक्षांना सटकावले आहे. जनतेचे प्रश्न काय आहेत? त्यांना कोणत्या समस्या भेडसावत आहेत? कोरोना खाली महाराष्ट्र दबतोय आणि हे नेते कानाखाली आवाज काढण्याच्या भांडणात गुंग आहेत, अशा शब्दांमध्ये बाबा आढाव यांनी शिवसेना आणि भाजप नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत. Baba Adhav also slammed the media

त्याच वेळी त्यांनी माध्यमांनाही एक प्रकारे खडसावले असून माध्यमे जनतेच्या समस्येकडे दुर्लक्ष करून नेत्यांना आणि त्यांच्या फुटकळ विधानांना अमाप प्रसिद्धी देत आहेत म्हणून हे नेते जास्त चेकाळले आहेत, असे त्यांनी सुनावले.



पुण्यातील रिंग रोड विरोधाच्या आंदोलनात त्यांनी भूमिका मांडली. रिंग रोड रिंग रोड सारख्या मोठ्या प्रकल्पांना विरोध का होतो याचे विश्लेषण त्यांनी केले. ते म्हणाले, की सरकारचे आजचे धोरण पैसे घ्या आणि गप्प बसा असे आहे. पण रिंग रोड सारख्या प्रकल्पात फक्त शेतकरीच विस्थापित होतो असे नाही तर सर्वसामान्य माणूसही विस्थापित होतो. त्याला सरकारने दिलेला पैसा पुरा पडत नाही. अशावेळी पर्यावरण आणि पुनर्वसन या दोन्ही अंगांनी सरकारने विचार करूनच मोठे प्रकल्प राबविले पाहिजेत. मुख्यमंत्र्यांचे आणि केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांचे मी या मूळ प्रश्नाकडे लक्ष वेधू इच्छितो.

पुण्याचा रिंग रोडमुळे 84 गावांचा विस्थापितांचा प्रश्न निर्माण होतोय. नितीन गडकरींनी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्याबरोबर त्या गावात चलावे कोणीही एक दगड उचलणार नाही आणि मारणार नाही. जनतेच्या समस्या त्यांनी प्रत्यक्ष येऊन समजावून घ्याव्यात आणि मगच रिंगरोड सारख्या प्रकल्पांना मंजुरी द्यावी, असे आवाहन बाबा आढाव यांनी केले

Baba Adhav also slammed the media

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात