Jan Ashirwad Yatra in Ratnagiri : केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. रत्नागिरी येथे बोलताना त्यांनी युवा सेनेकडून त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी झालेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. राणे म्हणाले की, युवा सेनेचा सचिव वरुण सरदेसाई आमच्या घरावर हल्ला करण्यासाठी आला होता. आता परत येऊ दे, परत जाणारच नाही. Union Minister Narayan Rane Criticizes Varun Sardesai In Jan Ashirwad Yatra in Ratnagiri
विशेष प्रतिनिधी
रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणेंची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. रत्नागिरी येथे बोलताना त्यांनी युवा सेनेकडून त्यांच्या जुहू येथील निवासस्थानी झालेल्या आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे. राणे म्हणाले की, युवा सेनेचा सचिव वरुण सरदेसाई आमच्या घरावर हल्ला करण्यासाठी आला होता. आता परत येऊ दे, परत जाणारच नाही.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्यामुळे अटक व सुटका होऊन तीन दिवस लोटले आहेत. आता पुन्हा एकदा भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवात झाली आहे. आज रत्नागिरीनंतर सिंधुदुर्गात जाऊन या यात्रेचा समारोप होणार आहे.
जन आशिर्वाद यात्रेच्या कोकण दौऱ्यादरम्यान रत्नागिरी येथील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. #JanAshirwadYatra pic.twitter.com/g5WvZ429Eg — Narayan Rane (मोदी का परिवार) (@MeNarayanRane) August 27, 2021
जन आशिर्वाद यात्रेच्या कोकण दौऱ्यादरम्यान रत्नागिरी येथील भाजप कार्यालयात कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांना मार्गदर्शन केले. #JanAshirwadYatra pic.twitter.com/g5WvZ429Eg
— Narayan Rane (मोदी का परिवार) (@MeNarayanRane) August 27, 2021
रत्नागिरीत बोलताना नारायण राणे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्यावर टीका केली. नारायण राणे म्हणाले, “आमच्या घरासमोर वरुण सरदेसाई आला होता. आमच्या घरावर हल्ला करतो त्याला अटक होत नाही, तो नातलग आहे. काय आणून देतो, त्यामुळे त्याची एवढी वट आहे. कोणत्याही नेत्याला एवढा पोलीस बंदोबस्त नाही तेवढा त्याला आहे. त्याने मार खाल्ला. एवढे पोलीस असून तिथल्या मुलांनी एवढा चोपला ना. आता परत आला तर परत नाही जाणार, आमच्या घरावर कोणी येईल, त्याला आम्ही नाही सोडणार. आणि तो वरुण येऊ देच,” असा इशाराही राणे यांनी दिला.
Union Minister Narayan Rane Criticizes Varun Sardesai In Jan Ashirwad Yatra in Ratnagiri
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App